Mithali Raj : मिताली राजचा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

India's ODI cricket captain Mithali Raj : भारतीय संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:50 AM2021-03-12T11:50:45+5:302021-03-12T11:51:10+5:30

whatsapp join usJoin us
Mithali Raj becomes first Indian batswoman to score 10,000 international runs | Mithali Raj : मिताली राजचा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

Mithali Raj : मिताली राजचा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनौ - भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये तिसरा एकदिवसीय सामना (india vs south africa women's cricket) आज खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहेत. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघासाठी आजचा दिवस खास ठरला आहे. संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. (India's ODI cricket captain Mithali Raj becomes first Indian batswoman to score 10,000 international runs)

मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी भारताची पहिली महिली क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. या यशासाठी बीसीसीआयने मितालीचे अभिनंदन केले आहे.  

मिताली राज हिने १० कसोटी, २११ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांसह मितालीने ८ शतके आणि ७५ अर्धशतके फटकावली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिची सरासरी ही ५० हून अधिकची आहे. 

Web Title: Mithali Raj becomes first Indian batswoman to score 10,000 international runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.