MI vs RR Latest News : मुंबई इंडियन्स पाच वर्षांनंतर मिळवला राजस्थान रॉयल्सवर विजय; दणक्यात साजरी केली हॅटट्रिक

MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना एकतर्फी झाला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 6, 2020 11:20 PM2020-10-06T23:20:08+5:302020-10-06T23:27:50+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RR Latest News : Mumbai Indians won by 57 runs, three win in a row take MI on top position in IPL 2020 Point Table | MI vs RR Latest News : मुंबई इंडियन्स पाच वर्षांनंतर मिळवला राजस्थान रॉयल्सवर विजय; दणक्यात साजरी केली हॅटट्रिक

MI vs RR Latest News : मुंबई इंडियन्स पाच वर्षांनंतर मिळवला राजस्थान रॉयल्सवर विजय; दणक्यात साजरी केली हॅटट्रिक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना एकतर्फी झाला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी मुंबई इंडियन्सची लाज वाचवली. या दोघांनी राजस्थान रॉयल्स ( RR) च्या गोलंदाजांना पळो की सळो करून सोडलं. मुंबईचा धावांचा खाली गेलेला ग्राफ या दोघांनी उंचावला आणि RRसमोर तगडे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात जोस बटलर ( Jos Buttler) वगळता राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मुंबई इंडियन्सनं हा सामना सहज जिंकून Point Table मध्ये अव्वल स्थान पटकावले. 2015नंतर मुंबईने IPLमध्ये राजस्थानला पराभूत केले. 

एक, दोन, तीन अन् चार... किरॉन पोलार्डनं घेतलेला हा अफलातून कॅच पाहाच

रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock) यांनी स्फोटक सुरुवात केली. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाज कार्तिक त्यागी ( Kartik Tyagi ) कडे कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ( Steve Smith) पाचवे षटक टाकण्यासाठी चेंडू दिला. रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे स्वागत केले. पण, त्याच षटकात कार्तिकनं MIला धक्का दिला. क्विंटन डी'कॉकला ( 23) अप्रतिम बाऊंसर टाकून त्यानं झेलबाद करून माघारी पाठवले. फ्रंटसिटवर बसलेल्या मुंबई इंडियन्सना श्रेयस गोपाळनं माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानं एकाच षटकात रोहित शर्मा (35)  व इशान किशन ( 0) यांना सलग चेंडूंवर बाद केले. 

Best Catch In IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा अनुकूल रॉयनं हवेत झेपावला अन् RRला मोठा धक्का बसला, Video

हार्दिक पांड्या किंवा किरॉन पोलार्ड येणं अपेक्षित होतं, परंतु कृणाल पांड्याला आघाडीवर पाठवले. पण, कृणाल 12 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर माघारी परतला.  सूर्यकुमार आणि हार्दिकनं अखेरच्या पाच षटकांत 12च्या सरासरीनं धावा चोपून मुंबई इंडियन्सला मोठा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमारने 47 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या, हार्दिक 30 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 76 धावांची भागीदारी करून संघाला 4 बाद 193 धावांचा पल्ला गाठून दिला.  

प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( 0), कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 6) आणि संजू सॅमसन ( 0) हे 12 धावांत माघारी परतले. ट्रेंट बोल्टने दोन, तर जसप्रीत बुमराहनं 1 विकेट घेतली. जोस बटलर ( Jos Buttler ) आणि महिपाल लोम्रोर ( Mahipal Lomror) यांनी 30 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल चहरनं ( Rahul Chahar) राजस्थान रॉयल्सचा मोठा धक्का दिला. चहरच्या गोलंदाजीवर लोम्रोरनं मारलेला फटका उत्तुंग उडाला आणि बदली खेळाडू म्हणून आलेल्या अनुकूल रॉयनं उलट्या दिशेनं धाव घेत हवेत झेपावत IPL 2020मधील अविश्वसनीय झेल घेतला. 

14व्या षटकात जेम्स पॅटिसन्सने RRच्या उरलेल्या विजयाच्या आशाही मावळून टाकल्या. जोस बटलर 44 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांसह 70 धावा करून माघारी परतला. किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) सीमारेषेवर त्याचा झेल टिपला. पण, हा झेल टिपताना पोलार्डची चांगलीच कसरत झाली. पुढील 38 धावांत RRचे उर्वरित फलंदाज तंबूत गेले. राजस्थानचा संपूर्ण संघ 18.1 षटकांत 136 धावांत माघारी गेला. जसप्रीत बुमराहनं ( 4/20) सर्वाधिक विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मुंबई इंडियन्सनं हा सामना 57 धावांनी जिंकला. 

Web Title: MI vs RR Latest News : Mumbai Indians won by 57 runs, three win in a row take MI on top position in IPL 2020 Point Table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.