MI vs KXIP Latest News : पंजाबचा अर्जुन; मोहम्मद शमीच्या अचूक थ्रोनं मुंबई इंडियन्सला दिला धक्का, Video

MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे सामना रंगत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 1, 2020 08:19 PM2020-10-01T20:19:52+5:302020-10-01T20:20:20+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KXIP Latest News :  Collect, aim, hit - Outstanding throw from Mohammed Shami to dismiss Suryakumar Yadav, Video | MI vs KXIP Latest News : पंजाबचा अर्जुन; मोहम्मद शमीच्या अचूक थ्रोनं मुंबई इंडियन्सला दिला धक्का, Video

MI vs KXIP Latest News : पंजाबचा अर्जुन; मोहम्मद शमीच्या अचूक थ्रोनं मुंबई इंडियन्सला दिला धक्का, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे सामना रंगत आहे. दोन्ही संघांना मागच्या सामन्यात प्रतिस्पर्धींकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे IPL 2020त पुन्हा विजयपथावर येण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्यात आज धावांचा पाऊस कोण पाडतो, याची सर्वांना उत्सुकता आहेच. शिवाय, KXIPच्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) अँड टीमला पेलावं लागणार आहे. मोहम्मद शमी (  Mohammed Shami) आज सर्व अनुभव पणाला लावेल. MI vs KXIP Latest News & Live Score 

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. KXIPनं आजच्या सामन्यात एम अश्विनच्या जागी के गोवथमला संधी दिली आहे आणि मुंबई इंडियन्सनं मागच्या सामन्यातील संघ कायम राखला आहे.  पहिल्याच षटकात शेल्डन कोट्रेलनं MIचा सलामीवीर क्विंटन डी'कॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्या षटकात रोहित शर्मानं KXIP गोलंदाज मोहम्मद शमीचे चौकारानं स्वागत केलं. चौथ्या षटकात लोकेश राहुलनं चेंडू रवी बिश्नोईच्या हाती सोपवला. त्याच्या फिरकीवर रोहितला धाव घेताना चाचपडताना दिसला. त्यामुळेच पाचव्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव ( 10) धावबाद झाला. MIला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 बाद 41 धावा करता आल्या.  MI vs KXIP Latest News & Live Score 

मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) भारी फिल्डिंग करताना सूर्यकुमार यादवला धावबाद केले. 

पाहा व्हिडीओ...

Web Title: MI vs KXIP Latest News :  Collect, aim, hit - Outstanding throw from Mohammed Shami to dismiss Suryakumar Yadav, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.