MI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हायहोल्टेज लढतीने होत असल्याने या लढतीबाबतची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 02:31 PM2020-09-19T14:31:10+5:302020-09-19T14:31:17+5:30

whatsapp join usJoin us
MI vs CSK: Pre-match atmosphere heats up, Rohit Sharma challenges CSK in cash | MI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले

MI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबुधाबी - मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणाऱ्या आयपीएलच्या सलामीच्या लढतीला आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, गेल्या हंगामात चेन्नईला चारीमुंड्या चीत करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नईला थेट आव्हान दिले आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे, आता त्यावर अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असे सांगत रोहितने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील लढत म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. त्यात यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हायहोल्टेज लढतीने होत असल्याने या लढतीबाबतची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. त्यामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा आज संध्याकाळी अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियममध्ये होणाऱ्या लढतीकडे लागल्या आहेत.

दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या लढतीपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअऱ केली आहेत. तसेच तयारी पूर्ण झाली आहे, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे, असे सांगत धोनीच्या संघाला इशारा दिला आहे. आयपीएलमध्ये चेन्नईने नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरी मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईला कायमच वरचढ ठरत आला आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातसुद्धा मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सला अवघ्या एका धावेने मात देत विजेतेपद पटकावले होते. त्या लढतीत चेन्नई सहज जिंकणार असे एकवेळ वाटत होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत चेन्नईला रोखले होते. अखेरीच लासिथ मलिंगाने मुंबईली नाट्यमय विजय मिळवून दिला होता.



चेन्नई सुपर किंग्सचे हे विक्रम मोडणे अशक्यच 

IPL च्या एका पर्वात घरच्या मैदानावर सर्वच्या सर्व सामने जिंकणाऱ्या पहिल्या संघाचा मान CSKनं पटकावला. त्यांनी 2011मध्ये घरच्या मैदानावर अपराजित मालिका कायम राखली होती.

चेन्नई सुपर किंग्सनं सर्वाधिक 8 वेळा IPLच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी 3 वेळा त्यांनी बाजी मारली आहे.
IPLच्या प्रत्येक पर्वात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा CSK हा एकमेव संघ आहे.  

आयपीएलमध्ये CSKची विजयाची टक्केवारी ही सर्व संघापेक्षा अधिक आहेत. 165 सामन्यांत CSKनं 100 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी ही 61.28 इतकी होते.

2008पासून एकच कर्णधार असलेला एकमेव संघ... महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पहिल्या मोसमापासून CSKच्या कर्णधारपदावर आहे.
IPLमधील फेअर प्ले पुरस्कार हा चेन्नई सुपर किंग्सनं सर्वाधिक 6 वेळा जिंकला आहे.

116 धावा करूनही CSKनं विजय मिळवला होता. IPLमध्ये सर्वात कमी धावांचा बचाव करण्याचा विक्रम CSKच्या नावावर आहे. त्यांनी 2009मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबला ( KXIP) 8 बाद 92 धावांत रोखून 24 धावांनी विजय मिळवला होता.

CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा IPL मध्ये 100 विजय मिळवणारा पहिलाच कर्णधार आहे.

CSKसाठी दोन शतक झळकावण्याचा पराक्रम मुरली विजयनं केला आहे. त्यानं 2010मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 127 आणि 2012मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध 113 धावा चोपल्या होत्या.

IPLच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम CSKच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्यानं 2013मध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या.  

2014मध्ये UAEत झालेल्या पाच सामन्यांपैकी CSKनं चार सामने जिंकले होते.

 
मुंबई इंडियन्सचे फॅन आहात, मग या गोष्टी माहित असायलाच हव्यात
इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात महागड्या (most expensive ) संघाचा मान मुंबई इंडियन्सला ( MI) जातो. Reliance groupने 826 कोटी 12 लाख 99,200 रुपयांत ही फ्रँचायझी घेतली. उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या ह्या संघाच्या मालकिण आहेत.

IPLच्या पहिल्या व दुसऱ्या पर्वात सर्वाधिक पाहिला गेलेल्या संघांचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. एकूण 239 मिलियन व्ह्यूअर्स या संघाला मिळाले होते.

मुंबई इंडियन्स हा IPL मधील सर्वात यशस्वी संघ आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. MI ने 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावले आहे. पण, यासह त्यांच्या नावावर चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 ( 2011) चेही जेतेपद आहे.

कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे मुंबई इंडियन्सचे फेव्हरिट प्रतिस्पर्धी आहेत. KKR विरुद्ध MIची विजयाची टक्केवारीह ही 76 इतकी आहे. MIने 25 पैकी 19 सामन्यांत विजय मिळवला, तर 6 सामने पराभूत झाले.

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) या संघांनं MIविरुद्ध सर्वाधिक यश मिळवले आहेत. 14 पैकी 7 सामने मुंबईने गमावले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला होता.

सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवणाऱ्या तीन संघांमध्ये ( KXIP व RR) मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. मुंबईनं दोन वेळा सुपर ओव्हर खेळली आणि दोन्ही वेळेस त्यांनी विजय मिळवला.

IPLमध्ये सर्वाधिक 1035 विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. आतापर्यंत एकही संघाला 1000 विकेट्सचा पल्ला गाठता आलेला नाही.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी IPL मध्ये सर्वाधिक 34 षटकं निर्धाव टाकली आहेत. IPLमधील नकोसा विक्रमही MIच्या नावावर आहेत. त्यांनी सर्वाधिक 104 नो बॉल टाकण्याचा विक्रम केला आहे.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या नावावर चार वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. इतरांच्या तुलनेत ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

IPLमध्ये नियमानुसार अंतिम 11मध्ये चार खेळाडूच खेळू शकतात, परंतु 2011मध्ये मुंबई इंडियन्सचे पाच परदेशी खेळाडू खेळवले होते. संघातील बरेच भारतीच खेळाडू दुखापतग्रस्त होते.

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या नावावर सर्वाधिक 170 विकेट्स आहेत. त्याने एकदा पाच विकेट्स, तर सहावेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

UAEत मुंबईची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. 2014मध्ये इथे खेळलेल्या पाचही सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली.

Web Title: MI vs CSK: Pre-match atmosphere heats up, Rohit Sharma challenges CSK in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.