MI vs CSK Latest News : रोहित शर्माला विश्रांती घेण्याचा सल्ला; मुंबई इंडियन्सनं दिले अपडेट्स

MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 23, 2020 07:08 PM2020-10-23T19:08:12+5:302020-10-23T19:11:49+5:30

whatsapp join usJoin us
MI vs CSK Latest News : Rohit Sharma ruled out of this game due to an injury he sustained in the last game, know MI playing XI | MI vs CSK Latest News : रोहित शर्माला विश्रांती घेण्याचा सल्ला; मुंबई इंडियन्सनं दिले अपडेट्स

MI vs CSK Latest News : रोहित शर्माला विश्रांती घेण्याचा सल्ला; मुंबई इंडियन्सनं दिले अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तेच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) एक पराभव म्हणजे स्पर्धेतूनच बाद झाल्यासारखे आहे. आज पराभूत झाले तरी MI ला फरक पडणार नसला तरी CSKसाठी पराभव जिव्हारी लागणारा ठरेल. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या संघाची अग्निपरीक्षा आहे. यापुढे त्यांना प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकावं लागेल. पण, या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत किरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) विरुद्धच्या सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनला रोहित आला नव्हता. त्यावेळी तो आजारी असल्याचे पोलार्डनं  सांगितलं होतं. पण, तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीपूर्वी बरा होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, आजच्या सामन्यात नाणेफेकीसाठी किरॉन पोलार्ड आला अन् सर्वांना आश्चर्य वाटले. मुंबई इंडियन्सनं याबाबत सांगितले की,''मागील सामन्यात रोहित शर्माच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. मागील चार दिवसांपासून रोहितच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत आहे. पण, आजच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा सल्ला संघ व्यवस्थापनानं घेतला आहे.''  

Mumbai Indians XI: सौरभ तिवारी, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर-नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह 

Chennai Super Kings XI: सॅम कुरन, फॅफ ड्यू प्लेसिस, राहुल गायकवाड, अंबाती रायुडू, नटराजन जगदीसन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, जोश हेझलवूड, दीपक चहर, इम्रान ताहीर, शार्दूल ठाकूर 

Web Title: MI vs CSK Latest News : Rohit Sharma ruled out of this game due to an injury he sustained in the last game, know MI playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.