MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचा 'सोशल' अटॅक; चेन्नई सुपर किंग्सची उडवली खिल्ली!

MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तेच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) एक पराभव म्हणजे स्पर्धेतूनच बाद झाल्यासारखे आहे

By स्वदेश घाणेकर | Published: October 23, 2020 08:26 PM2020-10-23T20:26:48+5:302020-10-23T20:28:00+5:30

whatsapp join usJoin us
MI vs CSK Latest News: Mumbai Indians' 'social' attack; trolled Chennai Super Kings | MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचा 'सोशल' अटॅक; चेन्नई सुपर किंग्सची उडवली खिल्ली!

MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचा 'सोशल' अटॅक; चेन्नई सुपर किंग्सची उडवली खिल्ली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तेच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) एक पराभव म्हणजे स्पर्धेतूनच बाद झाल्यासारखे आहे. आज पराभूत झाले तरी MI ला फरक पडणार नसला तरी CSKसाठी पराभव जिव्हारी लागणारा ठरेल. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या संघाची अग्निपरीक्षा आहे. यापुढे त्यांना प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकावं लागेल. पण, या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत किरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व सांभाळत आहे.

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज ( ०) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं दोन धक्के दिले. अंबाती रायूडू  ( २) व नटराजन  ( ०) सलग दोन चेंडूवर माघारी परतले. चेन्नईची अवस्था ३ बाद ३ अशी झाली होती. ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला ( १) बाद करून CSKला मोठ्या अडचणीत आणले. रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी या जोडीवरच CSK फॅन्सचा भरवसा होता, परंतु बोल्टनं जडेजाला बाद करून त्यांची कोंडी केली.

चेन्नईचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी परतला होता. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा निम्मा संघ पहिल्या पॉवर प्लेमध्ये तंबूत परतला आहे. धोनीनं सातव्या षटकात खणखणीत षटकार मारून आशेचा किरण दाखवला, परंतु राहुल चहरनं चतुराईनं पुढच्याच चेंडूवर धोनीला ( १६) माघारी जाण्यास भाग पाडले. चेन्नई सुपर किंग्सची इतकी वाईट अवस्था केल्यानंतर मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावरही त्यांची टिंगल उडवली. 


 

Web Title: MI vs CSK Latest News: Mumbai Indians' 'social' attack; trolled Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.