MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा Play 'Off'; मुंबई इंडियन्सनं रचला इतिहास

MI vs CSK Latest News: Indian Premier League ( IPL 2020) च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचित कधी झाली असावी.

By स्वदेश घाणेकर | Published: October 23, 2020 10:27 PM2020-10-23T22:27:58+5:302020-10-23T22:33:23+5:30

whatsapp join usJoin us
MI vs CSK Latest News : first time in IPL history Chennai Super Kings lost a match by ten wickets, out of Play Off race | MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा Play 'Off'; मुंबई इंडियन्सनं रचला इतिहास

MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा Play 'Off'; मुंबई इंडियन्सनं रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs CSK Latest News: Indian Premier League ( IPL 2020) च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचित कधी झाली असावी.  मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंजांची लय भारी कामगिरी करताना CSKच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. चेन्नई सुपर किंग्सनं IPLमधील सर्वाच निचांक धावसंख्येचा विक्रम टाळला असला तरी त्यांना समाधानकारक खेळ करता आला नाही. सॅम कुरननं ( Sam Curran) एकहाती खिंड लढवताना संघाची लाज वाचवली. त्यानं अर्धशतकी खेळी केली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. या पराभवासोबतच चेन्नई सुपर किंग्सचे Play Offमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. मुंबई इंडियन्सनं १४ गुणांसह अव्वल स्थान पक्कं करताना प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का केला. 

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज ( ०) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं दोन धक्के दिले. अंबाती रायूडू  ( २) व नटराजन  ( ०) सलग दोन चेंडूवर माघारी परतले. चेन्नईची अवस्था ३ बाद ३ अशी झाली होती. ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला ( १) बाद करून CSKला मोठ्या अडचणीत आणले. रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी या जोडीवरच CSK फॅन्सचा भरवसा होता, परंतु बोल्टनं जडेजाला बाद करून त्यांची कोंडी केली. चेन्नईचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी परतला होता. 

जसप्रीत बुमराह ( २/२५), राहुल चहर ( २/२२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नॅथन कोल्टर नायलनं एक विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक ( ४/१८) विकेट्स घेतल्या. सॅम कुरननं ४७ चेंडूंत ५२ धावा केल्या आणि त्या जोरावर चेन्नईला ९ बाद ११४ धावा करता आल्या. कुरननं फिरकीपटू इम्रान ताहीरसोबत ९व्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. 

प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांनी दमदार खेळ करताना मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. इशान किशन ३७ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहीला. क्विंटन डी'कॉकनं ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सनं दहा विकेट्स राखून विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्सचे Play Offमध्ये प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स प्रथमच १० विकेट्सनं पराभूत झाले आहेत. 

Web Title: MI vs CSK Latest News : first time in IPL history Chennai Super Kings lost a match by ten wickets, out of Play Off race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.