हिंदू-मुस्लीम यांच्यात वाद निर्माण करण्याला तुम्ही देशभक्ती म्हणता?; भारतीय क्रिकेटपटू संतापला

देशावर कोरोना व्हायरसच संकट असताना सोशल मीडियावर काही लोकं हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:56 PM2020-04-25T17:56:57+5:302020-04-25T17:58:04+5:30

whatsapp join usJoin us
Manoj Tiwary Has a Message of Unity for India Amid Lockdown; Cricketer Says Respect Every Religion svg | हिंदू-मुस्लीम यांच्यात वाद निर्माण करण्याला तुम्ही देशभक्ती म्हणता?; भारतीय क्रिकेटपटू संतापला

हिंदू-मुस्लीम यांच्यात वाद निर्माण करण्याला तुम्ही देशभक्ती म्हणता?; भारतीय क्रिकेटपटू संतापला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

देशावर कोरोना व्हायरसच संकट असताना सोशल मीडियावर काही लोकं हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला एका समुदायाला जबाबदार धरले जात आहे, तर पालघर येथील साधुंच्या हत्येला जातीय रंग दिले जात आहे. या सर्व परिस्थितीत भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यांनी नाराजी प्रकट केली होती. आता भारताचा आणखी एक फलंदाजानं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना फटकारले आहे.

बंगालचा मधल्या फळीचा फलंदाज मनोज तिवारीनं सोशल मीडियावरून ही नाराजी प्रकट केली आहे. त्यानं कोरोना व्हायरसच्या काळात सुरू असलेल्या धार्मिक वाद निर्माण करण्याच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्त केली. त्यानं पोस्ट केलं की,''हिंदू-मुस्लीम वाद सोडून गरीबांकडेही पाहा, तुम्ही अजून तिथे कुठे अडकला आहात?; हिंदु मुस्लीम यांच्यात वाद निर्माण करण्याला तुम्ही देशभक्ती म्हणता? कदाचित तुम्ही कुठे भटकला आहात...''

34 वर्षीय मनोज तिवारीनं विविध धर्मांचा वेश परिधान करून एकात्मतेचा संदेश दिला आहे. त्यानं रमजानच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बंगालच्या या फलंदाजानं रणजी करंडकाच्या मागील मोसमात 11 सामन्यांत 707 धावा केल्या आहेत. त्यानं हैदराबादविरुद्ध नाबाद 303 धावा केल्या आहेत. बंगालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, अंतिम सामन्यात सौराष्ट्रनं पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर जेतेपद पटकावले. मनोजनं 12 वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार

विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?

Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

स्टार फुटबॉलपटूच्या आईचं 22 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत Break Up; कारण ऐकून बसेल धक्का 

Big News : Corona Virus च्या संकटात ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती

ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचे कॅन्सरमुळे निधन

Video : तंदुरुस्तीसाठी Mohammed Shamiची कसून मेहनत; शेतात अनवाणी पायाने धाव

Web Title: Manoj Tiwary Has a Message of Unity for India Amid Lockdown; Cricketer Says Respect Every Religion svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.