लोकेश राहुलचा शतकी तडाखा; विराट सेना चितपट

कोहलीने सोडले दोन झेल; किंग्ज ईलेव्हन पंजाबने पार केला दोनशेचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 05:19 AM2020-09-25T05:19:51+5:302020-09-25T05:20:01+5:30

whatsapp join usJoin us
Lokesh Rahul's century hit virat kohali's team | लोकेश राहुलचा शतकी तडाखा; विराट सेना चितपट

लोकेश राहुलचा शतकी तडाखा; विराट सेना चितपट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : मोक्याच्यावेळी प्रतिस्पर्धी कर्णधार विराट कोहलीने सोडलेल्या दोन झेलचा फायदा घेत कर्णधार लोकेश राहुलने यंदाच्या आयपीएलमधील पहिली शतकी खेळी करताना किंग्ज ईलेव्हन पंजाबला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध २० षटकात ३ बाद २०६ धावांची भक्कम मजल मारुन दिली.


सलग सहाव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रात्रीच्यावेळी पडणाºया दवामुळे गोलंदाजी करताना होणारी अडचण ओळखून आरसीबी कर्णधार विराट कोहलीने अपेक्षित निर्णय घेतला. राहुल-मयांक अगरवाल यांनी ५७ धावांची सलामी दिल्यानंतर लेगस्पिनर युझवेंद्र चहलने आरसीबीला पहिले यश मिळवून दिले. त्याने मयांकला (२६) बाद केले. परंतु, यानंतर राहुलने निकोलस पूरनसह ५७ धावांची भागिदारी केली. पूरनलाही फार काही करता आले नाही. मात्र तरीही पंजाबन दोनशेचा पल्ला पार केला तो राहुल आणि राहुलपेक्षाही जास्त कोहलीमुळे. जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाºया कोहलीने राहुलचे १७व्या आणि १८व्या षटकांत दोन झेल सोडले. याचा फायदा घेत राहुलने अक्षरश: वादळी खेळी केली.


राहुलने १४ चौकार आणि ७ षटकारांचा पाऊस पाडत नाबाद १३२ धावा फटकवल्या. कर्णधार म्हणून राहुलने वॉर्नरचा विक्रम मोडताना सर्वोत्तम खेळी साकारली.

च्सलग सहाव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाºया संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
च्लोकेश राहुलने आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या.
च्सर्वात कमी डावांमध्ये २ हजार धावा पूर्ण करणार राहुल तिसरा फलंदाज ठरला. त्याने ६० डावांमध्ये हा पल्ला गाठला असून त्याआधी शॉन मार्श आणि ख्रिस गेल यांनी अनुक्रमे ५२ आणि ४८ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
च्राहुलने आयपीएलमध्ये दुसरे शतक झळकावले.
च्कर्णधार म्हणून सर्वोत्तम धावांची खेळी करताना राहुलने डेव्हिड वॉर्नरचा १२६ धावांचा विक्रम मोडला.
च्लोकेश राहुलची खेळी आयपीएलमधील चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी ठरली.

त्यामुळे केकेआर पराभूत: मोठी भागीदारी न झाल्यामुळे केकेआरला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला, असे मत भारताचा दिग्गज क्रिकेट सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. या सामन्यात केकेआरला एकही मोठी भागीदारी करता आली नाही. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भागीदारी होणे महत्त्वाचे असते, असेही सचिन म्हणाला. सचिनने टिष्ट्वट केले, ‘मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आणि राहुल चाहर व किरोन पोलॉर्ड यांनीही चांगली साथ दिली.

Web Title: Lokesh Rahul's century hit virat kohali's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020