KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळी खेळीला RRचे सांघिक उत्तर; KXIPच्या विजयी घोडदौडीला ब्रेक!

KXIPची विजयी घोडदौड रोखून RRनं स्वतःचं स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आता प्ले ऑफच्या उर्वरित तीन जागांसाठीची चुरस अधिक रंजक झाली आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 30, 2020 11:04 PM2020-10-30T23:04:15+5:302020-10-30T23:10:08+5:30

whatsapp join usJoin us
KXIP vs RR Latest News : Rajasthan Royals (186/3) beat Kings XI Punjab (185/4) by 7 wickets to keep playoff hopes alive | KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळी खेळीला RRचे सांघिक उत्तर; KXIPच्या विजयी घोडदौडीला ब्रेक!

KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळी खेळीला RRचे सांघिक उत्तर; KXIPच्या विजयी घोडदौडीला ब्रेक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ख्रिस गेलच्या ( Chris Gayle) फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससमोर ( Rajasthan Royals) तगडं आव्हान उभं केलं. पण, बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि RRच्या सर्व फलंदाजांनी सांघिक खेळ करताना संघाचा विजय पक्का केला. KXIPची विजयी घोडदौड रोखून RRनं स्वतःचं स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आता प्ले ऑफच्या उर्वरित तीन जागांसाठीची चुरस अधिक रंजक झाली आहे. 

राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथचा हा निर्णय जोफ्रा आर्चरनं पहिल्याच षटकात योग्य ठरवला. जोफ्रानं टाकलेल्या बाऊंसरनं KXIPचा ओपनर मनदीप सिंग याला चकवा दिला आणि बेन स्टोक्सनं अशक्य वाटणारा कॅच टिपून RRला पहिलं यश मिळवून दिलं. चौथ्या षटकात ख्रिस गेलला १२ धावांवर असताना जीवदान मिळालं. ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. राहुलनं ४१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार मारून ४६ धावा केल्या. 

गेल व निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीनं अबु धाबीत कॅरेबियन फ्लेवर आणला. गेलनं या सामन्यात ७ वा षटकार खेचून १००० षटकारांचा पल्ला गाठला. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. गेल ६३ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकार मारून ९९ धावांवर माघारी परतला. पंजाबनं २० षटकांत ४ बाद १८५ धावा चोपल्या. 

प्रत्युत्तरात बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) राजस्थान रॉयल्सला वादळी सुरुवात करून दिली. स्टोक्सनं पहिल्या विकेटसाठी रॉबीन उथप्पासह ६० धावांची भागीदारी केली. त्यात स्टोक्सच्या ५० धावा होत्या. त्यानं २६ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचले. ख्रिस जॉर्डननं KXIPला यश मिळवून दिले. उथप्पा व संजू सॅमसन यांनीही दुसऱ्या विकेटसाठई ५१ धावा जोडल्या. मुरुगन अश्वीनला लागोपाठ दोन षटकार खेचण्याच्या प्रयत्नात उथप्पा ( ३०) माघारी परतला. सॅमसन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथनं त्यानंतर संयमी खेळ केला, परंतु १५व्या षटकात सॅमसन धावबाद झाला. 

सूचिथच्या डायरेक्ट हिटवर सॅमसन ४८ धावांवर ( २५ चेंडू, ४ चौकार व ३ षटकार) बाद झाला. जोस बटलर आणि स्मिथ यांनी मोहम्मद शमीनं टाकलेल्या १७व्या षटकात १९ धावा चोपून सामना राजस्थानच्या पारड्यात अलगद झुकवला.बटलर ११ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २२, तर स्मिथ २० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं ३१ धावांवर नाबाद राहिला. राजस्थाननं १७.३ षटकांत ३ बाद १८६ धावा करून विजय पक्का केला.


 

Web Title: KXIP vs RR Latest News : Rajasthan Royals (186/3) beat Kings XI Punjab (185/4) by 7 wickets to keep playoff hopes alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.