KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळासमोर RR च्या गोलंदाजांचा पालापाचोळा, KXIPचं तगडं आव्हान 

राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

By स्वदेश घाणेकर | Published: October 30, 2020 09:19 PM2020-10-30T21:19:24+5:302020-10-30T21:25:04+5:30

whatsapp join usJoin us
KXIP vs RR Latest News : Chris Gayle 99 off 63; Kings XI Punjab finish with 185 runs  | KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळासमोर RR च्या गोलंदाजांचा पालापाचोळा, KXIPचं तगडं आव्हान 

KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळासमोर RR च्या गोलंदाजांचा पालापाचोळा, KXIPचं तगडं आव्हान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सलग विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. उभय संघांसाठी ही  लढत करा अथवा मरा अशा धर्तीची आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारणाऱ्या केएल राहुलच्या संघात एकदम चमत्कारिक बदल झाला आहे. त्यांनी सलग पाच विजय मिळवत अव्वल चारमध्ये स्थान पटकावले आहे. सध्या हा संघ १२ सामन्यात १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघ कंबस कसून मैदानावर उतरले आहेत. या सामन्यात ख्रिस गेलनं ( Chris Gayle) एक भीमपराक्रम केला. गेलच्या वादळानं राजस्थानच्या खेळाडूंचा पालापाचोळा केला. एका धावेनं गेलचं शतक हुकलं, परंतु KXIPनं तगडं आव्हान उभं केलं.

राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथचा हा निर्णय जोफ्रा आर्चरनं पहिल्याच षटकात योग्य ठरवला. जोफ्रानं टाकलेल्या बाऊंसरनं KXIPचा ओपनर मनदीप सिंग याला चकवा दिला आणि बेन स्टोक्सनं अशक्य वाटणारा कॅच टिपून RRला पहिलं यश मिळवून दिलं. चौथ्या षटकात ख्रिस गेलला १२ धावांवर असताना जीवदान मिळालं. वरुन आरोनच्या चेंडूवर गेलनं उंच फटका मारला आणि रियान परागच्या हातून तो सुटला. त्यानंतर गेल व लोकेश राहुलची गाडी जी सुसाट सुटली ती रोखताना RRच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आले. 

ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. गेलनं ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावलं. यंदाच्या आयपीएलमधील हे त्याचे तिसरे अर्धशतक ठरलं. लोकेश राहुलही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु बेन स्टोक्सनं त्याला माघारी पाठवलं. राहुलनं ४१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार मारून ४६ धावा केल्या. त्यानं गेलसह दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. त्यानंतर गेल व निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीनं अबु धाबीत कॅरेबियन फ्लेवर आणला. गेलनं या सामन्यात ७ वा षटकार खेचून १००० षटकारांचा पल्ला गाठला. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. गेल ६३ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकार मारून ९९ धावांवर माघारी परतला. पंजाबनं २० षटकांत ४ बाद १८५ धावा चोपल्या. 

Web Title: KXIP vs RR Latest News : Chris Gayle 99 off 63; Kings XI Punjab finish with 185 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.