KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण...

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 1, 2020 11:19 PM2020-11-01T23:19:46+5:302020-11-01T23:27:24+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs RR Latest News : Kolkata Knight Riders won by 60 runs, playoffs hopes are still alive, RR out | KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण...

KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. निराशाजनक सुरुवातीनंतर KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्या फटकेबाजीनं संघानं मोठा पल्ला गाठला. त्यानंतर RRची सुरुवात फार चांगली झाली नाही. पॅट कमिन्सनं आज त्याच्यासाठी मोजलेल्या पैशाचं मोल जपलं. त्यानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये चार विकेट्स घेतल्या आणि RRला जबरदस्त धक्के दिले. त्यातून सावरणं त्यांना जमलंच नाही. KKRहा सामना जिंकून प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. 

नितिश राणाच्या अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. शुबमन गिल व राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करताना KKRची गाडी रुळावर आणली. राहुल टेवाटियानं RRला कमबॅक करून दिलं. त्यानं गिल ( ३६) आणि सुनील नरीन ( ०) यांना सलग दोन चेंडूवर बाद केले. दिनेश कार्तिकही भोपळ्यावर टेवाटियाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. विचित्र पद्धतीनं तो बाद झाला. आंद्रे रसेलनं ११ चेंडूंत ३ षटकार व १ चौकार मारून २५ धावा चोपल्या. कार्तिक त्यागीला सलग तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. मॉर्गननं कॅप्टन इनिंग खेळताना ३५ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ६८ धावा करताना संघाला ७ बाद १९१ धावांचा पल्ला गाठून दिला. 

प्रत्युत्तरात रॉबीन उथप्पानं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. पण, त्या सहा धावांवरच तो माघारी परतला. पॅट कमिन्सनं त्याची विकेट घेतली. तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकनं अप्रतिम झेल घेताना बेन स्टोक्सचा माघारी जाण्यास भाग पाडले. स्टोक्स १८ धावाच करू शकला. स्टीव्ह स्मिथ ( ४) व संजू सॅमसन ( १) हेही झटपट मागे परतले. RRचा निम्मा संघ ३७ धावांवर माघारी परतला. KKRनं राजस्थान रॉयल्सला १११ धावांत गुंडाळल्यास ते थेट प्ले ऑफसाठी पात्र ठरले असते, परंतु त्यांनी ही संधी गमावली. पॅट कमिन्सनं ४ षटकांत ३४ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थीनंही दोन विकेट्स घेतल्या. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर ( ३५) व राहुल टेवाटिया ( ३१) यांनी संघर्ष दाखवला. राजस्थान रॉयल्सला ९ बाद १३१ धावांवर समाधान मानावे लागले. 

कोलकाताचं नशीब मुंबई इंडियन्सच्या हाती
कोलकाता नाईट रायडर्सनं आजच्या विजयासह चौथ्या स्थानावर झेप घेतली असली तरी त्यांना प्ले ऑफमधील प्रवेश पक्का करण्यासाठी अखेरच्या सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. 

 

 

Web Title: KKR vs RR Latest News : Kolkata Knight Riders won by 60 runs, playoffs hopes are still alive, RR out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.