KKR vs RR Latest News : जाना था जपान...!; दिनेश कार्तिकचा फ्लॉप शो, विचित्र पद्धतीनं झाला बाद Video

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात कडवी लढत पाहायला मिळत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 1, 2020 09:12 PM2020-11-01T21:12:52+5:302020-11-01T21:13:52+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs RR Latest News : Dinesh Karthik Gets Trolled After Golden Duck in Dubai, KKR reach 191 for 7 from 20 overs, Video  | KKR vs RR Latest News : जाना था जपान...!; दिनेश कार्तिकचा फ्लॉप शो, विचित्र पद्धतीनं झाला बाद Video

KKR vs RR Latest News : जाना था जपान...!; दिनेश कार्तिकचा फ्लॉप शो, विचित्र पद्धतीनं झाला बाद Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात कडवी लढत पाहायला मिळत आहे. निराशाजनक सुरुवातीनंतर KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्या फटकेबाजीनं संघानं मोठा पल्ला गाठला.

नितिश राणाच्या अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. शुबमन गिल व राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करताना KKRची गाडी रुळावर आणली. राहुल टेवाटियानं RRला कमबॅक करून दिलं. त्यानं गिल ( ३६) आणि सुनील नरीन ( ०) यांना सलग दोन चेंडूवर बाद केले. दिनेश कार्तिकही भोपळ्यावर टेवाटियाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. विचित्र पद्धतीनं तो बाद झाला. आंद्रे रसेलनं ११ चेंडूंत ३ षटकार व १ चौकार मारून २५ धावा चोपल्या. कार्तिक त्यागीला सलग तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. 

मॉर्गननं कॅप्टन इनिंग खेळताना ३५ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ६८ धावा करताना संघाला ७ बाद १९१ धावांचा पल्ला गाठून दिला. 

दिनेश कार्तिकची विकेट पाहा

नेटिझन्सकडून ट्रोल





 

Web Title: KKR vs RR Latest News : Dinesh Karthik Gets Trolled After Golden Duck in Dubai, KKR reach 191 for 7 from 20 overs, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.