IPL 2021: मोठी बातमी! सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं, आता विल्यमसन करणार नेतृत्व! 

IPL 2021: आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघानं मोठा निर्णय घेतला आहे. संघाच्या व्यवस्थापनानं कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला कर्णधारपदावरुन हटवलं असून केन विल्यमसन (Kane Williamson) याच्याकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 03:46 PM2021-05-01T15:46:25+5:302021-05-01T15:47:51+5:30

whatsapp join usJoin us
Kane Williamson replaces David Warner as Sunrisers captain in IPL 2021 | IPL 2021: मोठी बातमी! सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं, आता विल्यमसन करणार नेतृत्व! 

IPL 2021: मोठी बातमी! सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं, आता विल्यमसन करणार नेतृत्व! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघानं मोठा निर्णय घेतला आहे. संघाच्या व्यवस्थापनानं कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला कर्णधारपदावरुन हटवलं असून केन विल्यमसन (Kane Williamson) याच्याकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. 
सनरायझर्स हैदराबादनं अधिकृत पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. संघाच्या नेतृत्वात बदल करण्यासोबतच येत्या सामन्यात संघात आणखी काही बदल झालेले पाहायला मिळतील, असंही संघ व्यवस्थापनानं म्हटलं आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा आगामी सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार असून या सामन्यात संघ नव्या रणनितीनं उतरलेला दिसण्याची शक्यता आहे. यात काही नवे चेहरे देखील दिसू शकतात. (Kane Williamson replaces David Warner as Sunrisers captain in IPL 2021)

संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आले असले तरी डेव्हिड वॉर्नर येत्या सामन्यांमध्ये याआधी प्रमाणेच उत्तम योगदान देत राहिल असा विश्वास असल्याचंही सनरायझर्सनं म्हटलं आहे. 

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळत आहे. हैदराबादनं आतापर्यंत ६ सामने खेळले असून केवळ दोन सामन्यांमध्ये विजय प्राप्त करता आलेला आहे. संघ सध्या गुणतालिकेत सर्वात तळाला म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. 

Web Title: Kane Williamson replaces David Warner as Sunrisers captain in IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.