न्यूझीलंडनं केली कोरोनावर मात; किवी फलंदाजानं सांगितलं यशाचं कारण!

सोमवारी न्यूझीलंडने शेवटचा कोरोना रूग्ण बरा झाल्याची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:50 PM2020-06-08T17:50:25+5:302020-06-08T17:51:03+5:30

whatsapp join usJoin us
Jimmy neesham congratulates kiwi people for new zeland coronavirus free | न्यूझीलंडनं केली कोरोनावर मात; किवी फलंदाजानं सांगितलं यशाचं कारण!

न्यूझीलंडनं केली कोरोनावर मात; किवी फलंदाजानं सांगितलं यशाचं कारण!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ही 71 लाख, 14, 861 इतकी झाली आहे. त्यापैकी 34 लाख 73,819 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 4 लाख 06,564 जणांना प्राण गमवावे लागले. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एका देशानं कोरोनावर मात केल्याची गुड न्यूज सोमवारी मिळाली. न्यूझीलंडनं कोरोना व्हायरवर विजय मिळवला. देशातील अखेरचा कोरोना रुग्ण बरा झाला आणि आता न्यूझीलंडमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही.

न्यूझीलंडच्या  कोरोनामुक्त होण्यामागचं कारण क्रिकेटपटू जिमी नीशम यानं सांगितलं. त्यानं देशवासियांचे अभिनंदन केले. त्यानं ट्विट केलंकी, कोरोनावर मात केल्याबद्दल सर्व देशवासियांचे अभिनंदन. योग्य नियोजन, दृढ संकल्प आणि टीम वर्क, या गोष्टींमुळे पुन्हा एकदा आपल्या देशानं महानता सिद्ध केली.''


न्यूझीलंडची प्रधानमंत्री जेसिंडा अर्डेन यांनी ही घोषणा केली.   देशाची सीमा बंद केल्यावर तीन महिन्यांनंतर न्यूझीलंडने देशातून कोरोना व्हायरस नष्ट झाल्याची घोषणा केली आहे. आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाही. अॅक्टिव केस एकही राहिलेली नाही. त्यानंतर येथील लोकांनी याचा जल्लोष सोशल मीडियातून केला.

सोमवारी न्यूझीलंडने शेवटचा कोरोना रूग्ण बरा झाल्याची घोषणा केली. गेल्या 17 दिवसांमध्ये या देशात कोरोनाचा एकही नवा रूग्ण समोर आलेला नाही. न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या शेवटच्या रूग्णाचं वय 50 वर्षापेक्षा अधिक होतं. ऑकलॅंडमध्ये राहणाऱ्या महिलेमध्ये गेल्या 48 तासांमध्ये कोणतंही लक्षण दिसलं नाही. त्यानंतर सेंट मार्गारेट हॉस्पिटलने तिला घरी सोडले. सोमवारी तीन वाजता पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न देशातील लोकांशी बोलल्या. यावेळी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्याची घोषणा केली.

न्यूझीलंडचे डायरेक्ट जनरल ऑफ हेल्थ एशली ब्लूमफील्ड म्हणाले की, शेवटचा रूग्ण बरा झाल्यावर देशात आता एकही अॅक्टिव केस नाही. 28 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच असं झालंय. ते म्हणाले की, ही बाब फार उल्लेखनीय आहे. पण कोरोनाबाबत अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या साधारण 49 लाख आहे. 28 फेब्रुवारीला पहिली केस समोर आली होती. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या एकूण 1504 केसेस समोर आल्या होत्या. यातील 22 लोकांचा मृत्यू झाला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...

वर्ल्ड कप होणार नसेल, तर ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिका खेळण्यात अर्थ नाही - बीसीसीआय

Web Title: Jimmy neesham congratulates kiwi people for new zeland coronavirus free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.