मोटेरा स्टेडियमवर सौरव गांगुलीची बॅट तळपली, जय शाह XI संघाविरुद्ध तुफान फटकेबाजी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) ची ८९वी वार्षिक सर्वसाधारण संभा गुरुवारी ( २४ डिसेंबर) पार पडणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 24, 2020 09:50 AM2020-12-24T09:50:53+5:302020-12-24T09:53:43+5:30

whatsapp join usJoin us
Jay Shah XI beats Sourav Ganguly XI in friendly match between BCCI members at Motera Stadium | मोटेरा स्टेडियमवर सौरव गांगुलीची बॅट तळपली, जय शाह XI संघाविरुद्ध तुफान फटकेबाजी

मोटेरा स्टेडियमवर सौरव गांगुलीची बॅट तळपली, जय शाह XI संघाविरुद्ध तुफान फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) ची ८९वी वार्षिक सर्वसाधारण संभा गुरुवारी ( २४ डिसेंबर) पार पडणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमात दोन नवीन संघांचा समावेश हा या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पण, या बैठकीपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) विरुद्ध सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळवण्यात आला. देशातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला आणि त्यात सौरव गांगुलीची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. पण, जय शाह यांच्या टीमनं बाजी मारली.

प्रत्येकी १२-१२ षटकांच्या या सामन्यात जय शाह XIनं सौरव गांगुली XI संघावर २८ धावांनी विजय मिळवला. शाह XI संघानं प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १२८ धावा केल्या. मोहम्मद अझरुद्दीननं ३७ धावा आणि जयदेव शाहनं ३८ धावा कुटल्या. दरम्यान कर्णधार जय शाह फक्त २ धावा करून माघारी परतले.  

प्रत्युत्तरात गांगुलीच्या संघाला ४ बाद १०० धावाच करता आल्या. गांगुलीनं ३२ चेंडूंत ५३ धावा चोपल्या. मोटेरा स्टेडियमवर अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या जय शाहनं चार षटकांत ३९ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. जयदेव शाह यानंही दोन विकेट्स घेतल्या.  

अदानी, गोएंका शर्यतीत, BCCI दोन नव्या IPL टीमना मान्यता देणार!
 
आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपनं 2016 व 2017 च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत बीसीसीआय दोन नव्या संघांना मान्यता देण्याच्या तयारीत आहे. पण, २०२२च्या आयपीएलमध्ये १० संघ खेळतील. २०२१ची आयपीएल आहे त्याच ८ संघांमध्ये होणार आहे.

१० संघांचा समावेश म्हणजे होम-अवे असे एकूण ९४ सामने होतील आणि त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढेल.  तसेच पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी मिनी ऑक्शन फेब्रुवारीत होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Jay Shah XI beats Sourav Ganguly XI in friendly match between BCCI members at Motera Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.