Jasprit Bumrah: अखेर नको तेच झालं! जसप्रीत बुमराह T20 World Cup 2022 मधून बाहेर, BCCIची अधिकृत माहिती

BCCI ने अधिकृत ट्वीट करत बुमराह स्पर्धेसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 08:30 PM2022-10-03T20:30:40+5:302022-10-03T20:31:33+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022 confirms BCCI with Tweet | Jasprit Bumrah: अखेर नको तेच झालं! जसप्रीत बुमराह T20 World Cup 2022 मधून बाहेर, BCCIची अधिकृत माहिती

Jasprit Bumrah: अखेर नको तेच झालं! जसप्रीत बुमराह T20 World Cup 2022 मधून बाहेर, BCCIची अधिकृत माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेला मुकणार असल्याचे अखेर नक्की झाले. त्याला यंदाचा ऑस्ट्रेलियात होणारा टी२० वर्ल्ड कप खेळता येणार नसल्याचे BCCI ने अधिकृतरित्या ट्वीट करून सांगितले. गेले काही दिवस बुमराह विश्वचषकात खेळणार की नाही, याबद्दल साशंकता होती. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड दोघांनीही, टी२० वर्ल्डकपला अजून वेळ आहे असं सांगत, जसप्रीत बुमराह खेळेल की नाही हे सांगणे टाळले होते. पण अखेर काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चाच खऱ्या ठरल्या आणि अखेर नको तेच घडलं.

"जसप्रीत बुमराहला ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडावे लागले आहे. BCCI वैद्यकीय संघाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ICC पुरुष T20 विश्वचषक संघातून वगळण्यास सांगितले आहे. तपशीलवार मूल्यांकन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला होता. पण त्याला टी२० वर्ल्डकप देखील खेळता येणार नाही. लवकरच विश्वचषक स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी संघात बदली खेळाडूचा समावेश करण्यात येईल", अशी अधिकृत माहिती BCCIचे सचिव जय शाह यांनी दिली.

Web Title: Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022 confirms BCCI with Tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.