james anderson revealed when he met beautiful girl and then... | निळेशार डोळे, मस्त फिगर पाहून अँडरसन 'त्या' सुंदरीवर फिदा झाला, पण घडले भलतेच...
निळेशार डोळे, मस्त फिगर पाहून अँडरसन 'त्या' सुंदरीवर फिदा झाला, पण घडले भलतेच...

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये अँडरसनने असे काही किस्से लिहिले आहेत की, ज्यावर कुणीवर विश्वासही ठेवणार नाही. अँडरसनची नजर एकदा एका सुंदरीवर गेली. तिचे निळेशार डोळे आणि मस्त फिगर पाहून तो घायाळ झाला, पण त्यानंतर जे काही घडले त्यावर विश्वास बसणे कठीणंच आहे.


अँडरसनने आपल्या ' bowl. sleep. repeat.' या पुस्तकामध्ये एक चक्रावून टाकणारा किस्सा लिहिला आहे. इंग्लंडचा संघ सराव करत होता. त्यावेळी अँडरसनला आपल्या पेव्हेलियनजवळ एक तरुणी दिसली. तिचे निळेशार डोळे आणि सोनेरी केस पाहून तो भारावला. त्यानंतर तिचे निळेशार डोळे पाहून तर अँडरसन तिच्या प्रेमात पडला. पण काही वेळातच अँडरसनला मोठा धक्का बसला. कारण अँडरसन जिच्यावर भाळला होता ती तरूणी नव्हती, तर तो होता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस ब्रॉड.


Web Title: james anderson revealed when he met beautiful girl and then...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.