सचिन तेंडुलकरने या दिवशीच केला होता महाशतकाचा प्रारंभ

पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:55 PM2019-08-14T17:55:50+5:302019-08-14T17:56:42+5:30

whatsapp join usJoin us
It was only on this day that Sachin Tendulkar scored his 1st century | सचिन तेंडुलकरने या दिवशीच केला होता महाशतकाचा प्रारंभ

सचिन तेंडुलकरने या दिवशीच केला होता महाशतकाचा प्रारंभ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांची सेंच्युरी पूर्ण केली. क्रिकेट विश्वात महाशतक झळकावणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. पण या महाशतकाचा पाया सचिनने याच दिवशी इंग्लंडमध्ये रचला होता. कारण सचिनचे पहिले शतक १४ ऑगस्ट १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात झळकावले होते. या सचिनच्या पहिल्या-वहिल्या शतकामुळेच भारत पराभवापासून दूर सारला गेला होता.

सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे क्रिकेट विश्वात सचिन सोडल्यास एकाही खेळाडूला ही देदिप्यमान कामगिरी करता आलेली नाही. पण या महाशतकाचा प्रवास याच दिवशी १९९० साली सुरु झाला होता.

या दौऱ्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतापुढे ३९९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात वाईट झाली होती. भारताला पहिला धक्का चार धावांवर असताना बसला होता. त्यानंतर २ बाद ३५ अशी भारताची अवस्था झाली होती. त्यानंतर संजय मांजरेकर आणि दिलीप वेंगसरकर यांनी भारताचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला होता, पण यामध्ये त्यांनाही अपयश आले होते. त्यानंतर सटिन सहाव्या क्रमांकावर फलंदजीला आला आणि शतक लगावत त्याने भारताचा पराबव टाळला होता. सचिनने या खेळीमध्ये १८९ चेंडूंचा सामना करताना १७ चौकारांच्या मदतीने ११९ धावांची खेळी साकारली होती.

पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...

कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील अनेक ठिकाणांना पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे घर उध्वस्त झाली.   पूरग्रस्तांच्या मदतीला अनेक सरकारी यंत्रणांसह अनेक सेवाभावी संस्थाही पुढे आल्या. मराठी कलाकारांसह, बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही मदतीचा हात पुढे केला. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणनेही सामाजिक भान जपताना कोल्हापूर व सांगलीतील लोकांना मदत केली. पूरग्रस्तांना मदत करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू असावा. रहाणेनंतर आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यानं इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत तेंडुलकरनेही ट्विट केले. तो म्हणाला,''भारतातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पण, आता परिस्थिती हळुहळु पुर्वपदावर येत आहे आणि तेथील लोकांना मदतीची गरज आहे. मी माझ्याकडून मदत केली आहे. पंतप्रधान मदतनिधीमार्फत मी मदत केली आहे आणि तुम्हालाही आवाहन करत आहे.'' 

Web Title: It was only on this day that Sachin Tendulkar scored his 1st century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.