निवृत्तीनंतर धोनी 'या' क्षेत्रात ठेवणार पाऊल?; काही दिवसांआधी दिले होते संकेत

महेंद्रसिंग धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 03:21 PM2020-08-16T15:21:13+5:302020-08-16T15:21:23+5:30

whatsapp join usJoin us
it is said that after retirement, MS Dhoni will work in the field of agriculture | निवृत्तीनंतर धोनी 'या' क्षेत्रात ठेवणार पाऊल?; काही दिवसांआधी दिले होते संकेत

निवृत्तीनंतर धोनी 'या' क्षेत्रात ठेवणार पाऊल?; काही दिवसांआधी दिले होते संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. मात्र आता निवृत्तीनंतर धोनी काय करणार, हा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. परंतु 'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार निवृत्तीनंतर धोनी कृषी जगतात पाऊल ठेवण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

धोनी खताचा जागतिक ब्रॅण्ड बाजारात आणण्याचे संकेत आहे. या ब्रँडला गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्याची योजना आहे. काही दिवसांआधी धोनी आपल्या फार्म हाऊसवर ट्रॅक्टर चालवताना आणि शेती करताना दिसला होता. या कामात तो पुढं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे  प्रतिभावान खेळाडू तयार करण्याचाही धोनीचा संकल्प असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळातच धोनीची पुढची वाटचाल कशी असणार आहे, हे स्पष्ट होईल.

दरम्यान, ''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,'' धोनीची ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.

10 जुलै 2019चा तो पराभव जिव्हारी लागला?

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा धोनीच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरला. न्यूझीलंडने 8 बाद 239 धावा उभ्या केल्या प्रत्युत्तरात भारताला 49.3 षटकांत सर्वबाद 221 धावाच करता आल्या. पावसामुळे हा सामना दोन दिवस रंगला आणि भारतासमोर 240 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या, परंतु धोनी धावबाद झाला अन् भारताचे आव्हानही संपुष्टात आले. धोनीनं त्या सामन्यात 50, तर जडेजानं 77 धावा केल्या. हा पराभव धोनीच्या जिव्हारी लागला आणि त्याचवेळी न्यूझीलंडच्या ग्रँड एलिएटनं ट्विट केलं आणि भारताचे आव्हान संपुष्टात आल्याचे जाहीर केलं. त्याच्या ट्विटची वेळ होती 7.29 आणि म्हणून धोनीनं निवृत्तीसाठी हीच वेळ निवडल्याची चर्चा आहे.

Web Title: it is said that after retirement, MS Dhoni will work in the field of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.