It is difficult to chase the target in the final | अंतिम फेरीत लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण
अंतिम फेरीत लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण

- एबी डिव्हिलियर्स लिहितात...

विजयाची एक सवय जडते. सर्वांत अधिक चुरशीची स्पर्धा असलेल्या आयपीएलमध्ये शेवटी चढ-उतार अनुभवल्यानंतर अपेक्षित संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. चेन्नई सुपरकिंग्स संघ २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये चॅम्पियन ठरला आहे तर मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५ व २०१७ मध्ये जेतेपदाचा मान मिळवला आहे. रविवारी हैदराबादमध्ये उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीच्या निकालानंतर एका संघाच्या नावावर चार जेतेपद पटकावण्याचा विक्रम होईल.
सीएसके व मुबई संघ आयपीएलमध्ये सिरियल विनर्स आहे. दोन्ही संघ आपल्या योजनेवर व रणनीतीवर कायम असतात आणि दडपणाखाली चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहेत. हे दोन संघ २०१०, २०१३ आणि २०१५ मध्येही एकमेकांसोबत अंतिम फेरीत खेळलेले आहेत. मुंबईसाठी आयपीएलची ही पाचवी अंतिम लढत आहे तर चेन्नई संघ आठव्यांदा अंतिम फेरीत खेळत आहे. कमालीच सातत्य आहे. सीएसके दावेदार म्हणून या लढतीत सुरुवात करेल. दिल्लीविरुद्ध अनुभवाच्या जोरावर त्यांनी बाजी मारली. आयपीएलची अंतिम लढत हैदराबादमध्ये खेळल्या जाणार आहे. येथील खेळपट्टी तशी चांगली असते. येथे २०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या जावू शकतात आणि १५० ची धावसंख्याही विजयी स्कोअर सिद्ध होवू शकतो. उभय संघ प्रथम फलंदाजी करीत मोठे लक्ष्य उभे करण्यास उत्सुक असतील. अनेक कारणांमुळे अंतिम फेरीत लक्ष्याचा पाठलाग करणे कठिण असते.
मुंबई संघ वर्षानंतर जेतेपद पटकावण्याची आपली कामगिरी कायम ठेवण्यास उत्सुक असेल. शेवटी अंतिम सामना रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी यांच्यादरम्यानच्या लढाईचा राहील.

Web Title:  It is difficult to chase the target in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.