IPL 2020 : KKR चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत!; नेटिझन्सच्या प्रतिक्रियेवर शाहरुख खानचा भन्नाट रिप्लाय

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020)  कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत आहे

By स्वदेश घाणेकर | Published: October 27, 2020 07:08 PM2020-10-27T19:08:23+5:302020-10-27T19:09:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL2020: ‘Arre meri socho,’ Shah Rukh Khan’s hilarious response after fan questions him on KKR’s topsy-turvy season | IPL 2020 : KKR चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत!; नेटिझन्सच्या प्रतिक्रियेवर शाहरुख खानचा भन्नाट रिप्लाय

IPL 2020 : KKR चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत!; नेटिझन्सच्या प्रतिक्रियेवर शाहरुख खानचा भन्नाट रिप्लाय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020)  कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत आहे. दिल्ल कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सहज विजय मिळवणाऱ्या KKRला मागच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांची पाचव्या स्थानावर घसरण झाली. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना आता उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. 

KKRच्या निराशाजनक कामगिरीवर क्रिकेट चाहत्यानं सहमालक व बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याला प्रश्न विचारला आणि त्यावर किंग खाननं भन्नाट उत्तर दिलं. नेटिझन्सने विचारलं की,''यंदा कोलकाता नाईट रायडर्स जिंकणार का, तुम्हाला काय वाटतं?; KKRचा संघ क्रिकेट नाही,तर चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत.'' 

त्यावर शाहरुख म्हणाला, माझा विचार करा... माझ्या मनावर काय घालमेल सुरूय!!


 

Web Title: IPL2020: ‘Arre meri socho,’ Shah Rukh Khan’s hilarious response after fan questions him on KKR’s topsy-turvy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.