‘आयपीएल’ हाच चर्चेचा मुद्दा

कोविड-१९ मुळे इंडियन प्रीमियर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे; मात्र तरीही या लीगची सातत्याने चर्चा होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 11:52 PM2020-05-23T23:52:26+5:302020-05-23T23:52:37+5:30

whatsapp join usJoin us
‘IPL’ is the point of discussion | ‘आयपीएल’ हाच चर्चेचा मुद्दा

‘आयपीएल’ हाच चर्चेचा मुद्दा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदा आयपीएल होणार का? आणि आयसीसीचा पुढील अध्यक्ष कोण असेल? हे दोनच मुद्दे या आठवड्यात चर्चेत होते. या दोन्ही गोष्टी भारतीय क्रिकेटशी संबंधित आहेत.

कोविड-१९ मुळे इंडियन प्रीमियर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे; मात्र तरीही या लीगची सातत्याने चर्चा होत आहे. एप्रिल व मे महिन्यांत खेळली जाणारी ही स्पर्धा यावर्षी होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र, अनेक खेळाडू, व्यवस्थापक आणि तज्ज्ञ यावर्षी ही स्पर्धा घ्यावी अशा मताचे आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन व मायकल आथर्टन यांनी आपल्या कॉलममध्ये आयपीएलसंदर्भात चर्चा केली आहे.

आयपीएल खेळविण्यासंदर्भात बीसीसीआयच्या पडद्यापाठीमागच्या हालचाली सुरूच आहेत. भारतातच या स्पर्धा व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरूआहेत. मात्र, जर स्थिती सुधारली नाही, तर २००९ व २०१४ प्रमाणे अन्य देशांत ही स्पर्धा खेळविली जाऊ शकते का, यावरही विचार सुरूआहे. जरी आॅस्ट्रेलियात होणारी टी-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप रद्द करावी लागली तरी आयपीएल खेळविली जावी, असा एक सूर आहे. जर आयपीएल रद्द करावी लागली तर अंदाजे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या बीसीसीआयलाही इतके मोठे नुकसान सहन होण्यासारखे नाही. याचा भारताबरोबरच अन्य देशांनाही अप्रत्यक्षरीत्या फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी आयपीएलच्या आयोजनाबाबत सर्वांचेच एकमत आहे असे नाही. आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांच्या मतानुसार आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा आपल्या देशातील क्रिकेटवर जास्त लक्ष दिले पाहिजे.

आयपीएलचे आयोजन करावे असे म्हणणाऱ्यांच्या मते आयपीएल झाले नाही तर तीन ते साडेतीन हजार कोटींच्या महसुलाला कायमचे मुकावे लागेल. जर वर्ल्ड टी-२० पुढे ढकलली तर तोटा कमी होईल. आॅस्ट्रेलियामध्ये प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे या वर्षी होणाºया वर्ल्ड टी-२०ला कसा प्रतिसाद मिळेल ते आताच सांगता येणार नाही.

त्यापेक्षा आॅस्ट्रेलियाला २०२२च्या वर्ल्ड टी-२०चे यजमानपद दिले तर याचा मोठा आर्थिक फायदा क्रिकेट आॅस्ट्रेलिया व आयसीसीला होणार आहे. असे झाले तर यावर्षी आयपीएल खेळविला जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. दुसरी एक गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटचे नवे क्रिकेट संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांनी आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांच्या नावाचे समर्थन केले आहे. शशांक मनोहर यांची मुदत जुलैमध्ये संपत असून, त्यांना मुदतवाढ नाकारली आहे.

स्मिथच्या विधानानंतर एससीएचे अध्यक्ष ख्रिस नेझानी यांनी स्मिथ यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे; मात्र त्यांना भारताबरोबरचे क्रिकेटमधील संबंध दृढ करायचे आहेत हे यावरून स्पष्ट होते. मात्र, गांगुलीला स्वत: आयसीसीच्या कामात रस आहे की नाही, याचा मुख्य मुद्दा आहे. बीसीसीआय प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी जुलैमध्ये अधिकृतपणे संपणार आहे; मात्र बीसीसीआयने याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. यावर काय निर्णय होतो हेही महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे जुलै महिना भारत आणि क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण महिना ठरणार आहे.

Web Title: ‘IPL’ is the point of discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.