IPL Auction 2021 : विराट कोहलीची विकेट घेतली अन् मोईन अलीला लॉटरी लागली; चेन्नई सुपर किंग्सनं ओतला पैसा!

IPL Auction 2021, Moeen Ali, Virat Kohli, CSK : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी उत्सुक असल्याची पहिली प्रतिक्रिया मोईन अलीनं दिली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 04:35 PM2021-02-18T16:35:21+5:302021-02-18T16:35:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2021 : Moeen Ali sold to Chennai Super Kings at 7cr; that 5 sixes turning point  | IPL Auction 2021 : विराट कोहलीची विकेट घेतली अन् मोईन अलीला लॉटरी लागली; चेन्नई सुपर किंग्सनं ओतला पैसा!

IPL Auction 2021 : विराट कोहलीची विकेट घेतली अन् मोईन अलीला लॉटरी लागली; चेन्नई सुपर किंग्सनं ओतला पैसा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठीच्या लिलावाच्या पहिल्या टप्प्यात आश्चर्यचकीत करणारे धक्के बसले. पंजाब किंग्सनं ( KXIP) रिलीज केलेल्या ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) साठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. त्यात १४.२५ कोटींसह RCBनं बाजी मारली. त्यानंतर ख्रिस मारिस ( Chris Morris) याच्यासाठी मुंबई इंडियन्स ( MI), RR आणि KXIP यांच्यात रस्सीखेच रंगली. पण, राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) १६. २५ कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतले.  ( Moeen Ali sold to Chennai Super Kings) 

IPL Auction 2021 : ख्रिस मॉरिसनं इतिहास रचला, युवराज सिंगला मागे टाकून सर्वात महाग खेळाडू ठरला

चेन्नईला या लिलावात एकच परदेशी खेळाडू घ्यायचा होता आणि म्हणूनच ते मॅक्सवेल, मॉरिस यांच्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु १९.९ कोटीच पर्समध्ये असल्यानं त्यांनी माघार घेतली. पण, त्यांनी ही जागा मोईन अलीला ( Moeen Ali) आपल्या चमूत घेत भरून काढली. इंग्लंड-भारत यांच्यातल्या चेन्नईत खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत अलीनं ८ विकेट्स घेतल्या आणि १० चेंडूंत ५ खणखणीत षटकार खेचले. या विकेट्समध्ये त्यानं दोन्ही डावांत कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा त्रिफळा उडवला. तेव्हाच CSKच्या फॅन्सनी लिलावात अली याला महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) घ्यावं अशी चर्चा रंगली आणि चेन्नईनं त्याला ७ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. RCBनं त्याला रिलीज केलं होतं.



आतापर्यंत काय काय घडलं? IPL Auction 2021 : ग्लेन मॅक्सवेलसाठी CSK vs RCB सामना; ठरला आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू  
ख्रिस मॉरिस- १६.२५ कोटी (राजस्थान रॉयल्स)
डेविड मलान- १.५० कोटी  (पंजाब किंग्स)
शिवम दुबे- ४.४० कोटी (राजस्थान रॉयल्स)
मोईन अली- ७ कोटी (चेन्नई सुपरकिंग्ज)
शाकिब अल हसन - ३.२० कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)
केदार जाधव- अनसोल्ड
ग्लेन मॅक्सवेल- १४.२५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
हनुमा विहारी- अनसोल्ड
अॅरॉन फिन्च- अनसोल्ड
एविड लुईस- अनसोल्ड
स्टीव्ह स्मिथ- २.२० कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
जेसन रॉय- अनसोल्ड
एलेक्स हेल्स- अनसोल्ड
करुण नायर- अनसोल्ड IPL Auction 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा हटके अंदाज; घातली 'Definitely Not'ची जर्सी, जाणून घ्या कारण

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)  -
रिलीज खेळाडू : केदार जाधव, हरभजनसिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन;

रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन;

१९.९ कोटी शिल्लक - चेन्नईला ६ भारतीय खेळाडूंची जागा भरायची आहे.
 

Web Title: IPL Auction 2021 : Moeen Ali sold to Chennai Super Kings at 7cr; that 5 sixes turning point 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.