IPL Auction 2021 : ग्लेन मॅक्सवेलसाठी CSK vs RCB सामना; ठरला आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू  

IPL Auction 2021 Glenn Maxwell : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) ऑक्शमनध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टैपलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 03:48 PM2021-02-18T15:48:12+5:302021-02-18T15:49:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2021 : Glenn Maxwell is sold to RCB for a whopping 14.25cr, Bidding war between CSK and RCB  | IPL Auction 2021 : ग्लेन मॅक्सवेलसाठी CSK vs RCB सामना; ठरला आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू  

IPL Auction 2021 : ग्लेन मॅक्सवेलसाठी CSK vs RCB सामना; ठरला आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) ऑक्शमनध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टैपलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. १४.२५ कोटीपर्यंत दोघांमध्ये चढाओढ रंगली पण पर्समध्ये १९ कोटीच असल्यानं CSKनं माघार घेतली. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) च्या संघानं त्याला १४.२५ कोटींत खरेदी केलं. आता विराट, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल अशी तगडी फौज RCBकडे आहे. आयपीएल इतिहासातील तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. Glenn Maxwell becomes the third most expensive player in IPL history

ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell), मुळ किंमत २ कोटी (Base Price: INR 2 Crores) - किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेला यूएईत साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे KXIPनं त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पण, नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये त्यानं १४३.५६च्या स्ट्राईक रेटनं ३७९ धावा चोपल्या. त्यामुळे आज त्याच्यासाठी चुरस रंगली. CSKला कोटा पूर्ण करण्यासाठी एकच परदेशी खेळाडू घ्यायचा होता. त्यामुळे ते मॅक्सवेलसाठी अडून बसले होते. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि स्टीफन फ्लेमिंग ( Stephen Flemming) हे फोनवरून लक्ष्मीपती बालाजीला सूचना करत होते. IPL Auction 2021, IPL Auction 2021 Live Today, IPL Auction 2021 Latest News, IPL Auction 2021 News in Marathi, IPL Auction 2021 Latest Marathi News, IPL Auction 2021 News, IPL Auction 2021 Live Streaming, IPL Auction Live


ग्लेन मॅक्सवेलची ऑक्शनमधील कामगिरी 
२०१३ - १ कोटी - मुंबई इंडियन्स 
२०१४ - ६ कोटी - पंजाब किंग्स
२०१८ - ९ कोटी - दिल्ली कॅपिटल्स
२०२०- १०.७५ कोटी - पंजाब किंग्स 
२०२१ - १४.२५ कोटी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

आयपीएल ऑक्शनमधील महागडे खेळाडू ( Highest purchases in #IPLAuction ) 
युवराज सिंग - १६ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स २०१५)  
पॅट कमिन्स  १५.५ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, २०२०) 
बेन स्टोक्स १४.५ कोटी ( रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)
ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१) 
युवराज सिंग १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  २०१४)  

सर्वात महागडे खेळाडू ( Most expensive foreign players in IPL Auctions) 
पॅट कमिन्स - १५.५ कोटी, २०२०
बेन स्टोक्स - १४.५ कोटी, २०१७
ग्लेन मॅक्सवेल - १४.२५ कोटी, २०२१ 

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर ( Royal Challengers Bangalore) -

रिलीज खेळाडू : मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच,ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना, उमेश यादव;

रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे;

३५.९० कोटी शिल्लक- यातून त्यांना ९ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंना ताफ्यात घ्यायचे आहे.
 

Web Title: IPL Auction 2021 : Glenn Maxwell is sold to RCB for a whopping 14.25cr, Bidding war between CSK and RCB 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.