IPL auction for the 2020 season set to take place in December | IPL 2020साठीच्या लिलावाचा मुहूर्त ठरला; फ्रँचायझींसाठी मोठी खूशखबर

IPL 2020साठीच्या लिलावाचा मुहूर्त ठरला; फ्रँचायझींसाठी मोठी खूशखबर

पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगला ( IPL) अद्याप सात महिन्यांचा कालावधी आहे. पण, आतापासूनच सर्व फ्रँचायझी संघबांधणीला सुरुवात केली आहे. काही फ्रँचायझींनी खेळाडूंची अदलाबदलही केली आहे. पुढील वर्षी ही स्पर्धा एप्रिलमध्ये खेळवण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी डिसेंबर 2019मध्ये लिलाव होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

IPLची संघ संख्या वाढणार, दोन नव्या संघांसाठी टाटा, अदानी, गोयंका शर्यतीत

वर्ल्ड कपमधील कामगिरीनंतर 'या' पाच खेळाडूंसाठी IPL मध्ये चढाओढ

वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीनंतर अनेक खेळाडूंसाठी आयपीएल मालकांनी कंबर कसली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा ही मार्चपासून सुरू करावी लागली होती. पण, आता तो मुद्दा येणारच नाही कारण आसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान पटकावण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल.

मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार आयपीएलच्या पुढील मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. तारीख अद्याप ठरलेली नाही. शिवाय संघांसाठीची सॅलरी कॅप वाढवण्यात आलेली आहे. प्रत्येक फ्रँचायझींना सॅलरी कॅपमध्ये 3 कोटींची वाढ मिळणार आहे, परंतु याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL auction for the 2020 season set to take place in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.