Video : अफलातून झेल... किंग्स इलेव्हन पंजाबनं 3 कोटी मोजले अन् खेळाडूनं निवड सार्थ ठरवली

एका अफलातून झेलनं सर्वांना अवाक् केलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 07:19 PM2019-12-21T19:19:59+5:302019-12-21T19:20:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL auction 2020: Kings XI recruit Chris Jordan takes a blinder in BBL, Video | Video : अफलातून झेल... किंग्स इलेव्हन पंजाबनं 3 कोटी मोजले अन् खेळाडूनं निवड सार्थ ठरवली

Video : अफलातून झेल... किंग्स इलेव्हन पंजाबनं 3 कोटी मोजले अन् खेळाडूनं निवड सार्थ ठरवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबनं तीन कोटींत इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला आपल्या ताफ्याल दाखल करून घेतले. जॉर्डननं बिग बॅश लीगमध्ये शनिवारी पैसा वसूल कामगिरी केली. पर्थ स्कॉचर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जॉर्डननं क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवली. त्यानं एक अफलातून झेल घेत सर्वांना अवाक् केले. याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या मिचेल मार्शनं प्रतिस्पर्धी मेलबर्न रेनेगॅडेस संघांच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पर्थ स्कॉचर्स संघानं 7 बाद 196 धावांचा डोंगर उभा केला. पण, सामन्याच्या दुसऱ्या डावात जॉर्डनचा झेल चर्चेचा विषय ठरला.  


प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सच्या लिएम लिव्हिंगस्टोन आणि जोश इंग्लीस या सलामीवीरांना साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, कॅमेरून बँक्रॉफ्ट व अॅश्टन टर्नर यांनी दमदार खेळ केला. बँक्रॉफ्टनं 37 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 51 धावा जोडल्या. टर्नरने 26 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 36 धावा केल्या. त्यानंतर मार्शच्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. मार्शनं 22 चेंडूंत 1 चौकार व 6 षटकारांचा अतषबाजी करताना नाबाद 56 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघानं 196 धावांपर्यंत मजल मारली. 

लक्ष्याचा पाठलाग करताना शॉन मार्श आणि बीयू बेवस्टर यांनी तुफान फटकेबाजी करून तोडीसतोड उत्तर दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्न संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अॅरोन फिंच ( 28) आणि सॅम हार्पर ( 15) हे त्वरित माघारी परतले. पण, त्यानंतर शॉन मार्शनं तुफान खेळी केली. 38 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकार लगावताना त्यानं 55 धावा केल्या. त्याला बीजे वेबस्टरची तोडीसतोड साथ मिळाली. पण, फवाद अहमदनं मार्शला बाद केल्यानंतर मेलबर्न संघाचा डाव गडगडला. वेबस्टरनं 37 चेंडूंत  4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 67 धावा केल्या. मेलबर्न संघाला 6  बाद 185 धावांपर्यंत मजल मारता आली आणि पर्थ स्कॉचर्स संघानं 11 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या 18व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डॅनिएल ख्रिस्टीयनचा अफलातून झेल घेत जॉर्डननं सर्वांची वाहवाह मिळवली. 


पाहा व्हिडीओ...

Web Title: IPL auction 2020: Kings XI recruit Chris Jordan takes a blinder in BBL, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.