IPL 2022 Retention : मोठी बातमी, आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 10:25 AM2021-11-30T10:25:10+5:302021-11-30T10:26:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Retention : MS Dhoni, Virat Kohli, Rohit Sharma, Jasprit Bumrah retained by IPL franchises for 2022 | IPL 2022 Retention : मोठी बातमी, आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

IPL 2022 Retention : मोठी बातमी, आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद व लखनौ या फ्रँचायझीच्या समावेशामुळे खेळाडूंचे लिलाव होत आहे. त्यामुळे ८ फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यात केवळ ४ खेळाडूंनाच कायम राखता येणार आहे. त्यामुळे फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे. फ्रँचायझींना १ ते ३० नोव्हेंबर हा कालावधी दिला गेला होता आणि आज त्याची अखेरची तारीख आहे. अनेक फ्रँचायझींनी कोणाला कायम राखायचे याचा निर्णय घेतला आहे, तर काही फ्रँचायझी अजूनही संभ्रमात आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुनील नरीन, आंद्रे रसेल व ग्लेन मॅक्सवेल आदी खेळाडूंना फ्रँचायझींनी कायम राखले आहे. ESPNcricinfoनं दिलेल्या माहितीनुसार  पुढील फ्रँचायझींनी त्यांचे रिटेन खेळाडू ठरवले आहेत. 

  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली
  • कोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अॅनरीच नॉर्ट्झे
  • राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन  

 

रिटेशन नियम 
बीसीसीआयनं  प्रत्येकी फ्रँचायझीला ९० कोटींची पर्स दिली आहे आणि त्यातच त्यांना संघबांधणी करायची आहे. बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला आहे. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल. समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील.

चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठई ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.

Web Title: IPL 2022 Retention : MS Dhoni, Virat Kohli, Rohit Sharma, Jasprit Bumrah retained by IPL franchises for 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.