IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ६, ६, ६ ; गुजरात टायटन्स फायनलमध्ये; हार्दिक पांड्या-डेव्हिड मिलर यांची मॅच विनिंग भागीदारी

Gujarat Titans will be playing IPL 2022 Final लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धक्का बसूनही गुजरात टायटन्सने जबरदस्त खेळ केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:35 PM2022-05-24T23:35:31+5:302022-05-24T23:46:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Gujarat Titans will be playing IPL 2022 Final, David Miller* 68 (38) and Hardik Pandya 40 (27) beat Rajasthan royals by 7 wickets  | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ६, ६, ६ ; गुजरात टायटन्स फायनलमध्ये; हार्दिक पांड्या-डेव्हिड मिलर यांची मॅच विनिंग भागीदारी

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ६, ६, ६ ; गुजरात टायटन्स फायनलमध्ये; हार्दिक पांड्या-डेव्हिड मिलर यांची मॅच विनिंग भागीदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. पण, शुबमन गिल ( Shubman Gill ) व मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) यांनी RRच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी ४३ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केली. या दोघांनंतर कर्णधार हार्दिक पांड्या व डेव्हिड मिलर यांनी दमदार खेळी केली आणि गुजरातला विजय मिळवून दिला. या दोघांनी ६० चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण करताना गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. विजयासाठी ६ चेंडूंत १६ धावा हव्या असातना मिलरने ६ ,६,६ असा तीन चेंडूंत सामना संपवला.

यशस्वी जैस्वाल ( ३) लगेच माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व बटलर यांनी ४७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. संजूने २६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा कुटल्या. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलनेही २० चेंडूंत २८ धावांची खेळी केली. समोरील फलंदाज आक्रमक खेळ करत असतान बटलर मात्र शांत होता. १७व्या षटकात त्याने गिअर बदलला.. शांत असलेल्या वादळाने अचानक रुद्रावतार घेतला. त्याला रोखण्याची संधी हार्दिक व राशिदला मिळाली होती, परंतु त्यांनी ती गमावली. बटलरने ३८ चेंडूंत ३९ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पुढील १८ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. बटलर ५६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८९ धावांवर  रन आऊट झाला. राजस्थानने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला.  


लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने धक्का दिला. त्याने टाकलेल्या भन्नाट चेंडूचा अंदाज घेण्यात वृद्धीमान साहा चुकला अन्  यष्टिरक्षक संजू सॅमसनने सोपा झेल टिपला. पण, त्यानंतर शुबमन गिल व मॅथ्यू वेड यांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. दोघांनीही चौफेक फटके बाजी मारली. KKRचा माजी खेळाडू असल्याने गिलला इडन गार्डनच्या खेळपट्टीचा चांगला अभ्यास होता. त्यामुळे त्याचे फटके पाहण्यासारखे होते. मात्र, ८व्या षटकात या जोडीला नजर लागली. आर अश्विनच्या गोलंदाजीवर गिलने डीप मिडविकेटच्या दिशेने फटका मारला आणि एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी पळाला. पण, वेडने त्याला माघारी जाण्यास सांगितले, तोपर्यंत गिल बराच पुढे आला होता आणि देवदत्त पडिक्कलने चेंडू हेटमायरकडे थ्रो केला होता. 


गिल २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर रन आऊट झाला. जाता जाता तो वेडला बरंच बडबडला. वेडही ( ३५)  १०व्या षटकात ओबेड मॅकॉयच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जोस बटलरने सीमारेषेवर सुरेख कॅच टिपला. हार्दिक पांड्या व डेव्हिड मिलर यांनी GT चा डाव  सावरला. RRचा यशस्वी गोलंदाज आर अश्विन याच्या ४ षटकांत गुजरातने ४० धावा चोपल्या. पांड्या व मिलर ही जोडी चांगलीच सेट झाली होती आणि त्यांना रोखणे राजस्थानला अवघड होऊन बसले होते. १७व्या षटकात गुजरातने १५० धावा फलकावर चढवल्या. युजवेंद्र चहलही आज विकेटवीना राहिला आणि त्याने ४ षटकांत ३२ धावा दिल्या.


गुजरातला १२ चेंडूंत २३ धावांची गरज होती. मिलरने ३५ चेंडूंत आयपीएलमधील १२ वे अर्धशतक पूर्ण केले. ओबेय मॅकॉयने १९व्या षटकात ७ धावा दिल्याने अखेरच्या षटकांत गुजरातला १६ धावा हव्या होत्या. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला पहिलाच चेंडू मिलरने षटकार खेचला. पुढचा चेंडूही सीमापार पाठवून मिलरने ४ चेंडू ४ धावा असा सामना आणला. तिसराही चेंडू षटकार खेचून मिलरने गुजरातचा विजय पक्का केला. गुजरातने ३ बाद १९१ धावा करून ७ विकेट्स राखून बाजी मारली. मिलर ३८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर, तर पांड्या २७ चेंडूंत ५ चौकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला. 

पाहा व्हिडीओ...

Web Title: IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Gujarat Titans will be playing IPL 2022 Final, David Miller* 68 (38) and Hardik Pandya 40 (27) beat Rajasthan royals by 7 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.