Shubman Gill IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral 

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:46 PM2022-05-24T22:46:26+5:302022-05-24T22:46:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : A complete mess between Matthew Wade and Shubman Gill and Gill has to run out  for excellent 35, Video | Shubman Gill IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral 

Shubman Gill IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. ट्रेंट बोल्टच्या सुसाट वेगाने वृद्धीमान साहाला भोपळ्यावर माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर शुबमन गिल ( Shubman Gill ) व मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) यांनी RRच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पण, या दोघांची जमलेली जोडी तुटली तेव्हा गिल भर मैदानावर वेडसोबत भांडण करताना दिसला.

रियान पराग पुन्हा वादात अडकला, यावेळेस आर अश्विनवर भडकला; Live मॅचमध्ये भलताच गोंधळ, Video 

यशस्वी जैस्वाल ( ३) लगेच माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व बटलर यांनी ४७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. संजूने २६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा कुटल्या. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलनेही २० चेंडूंत २८ धावांची खेळी केली. समोरील फलंदाज आक्रमक खेळ करत असतान बटलर मात्र शांत होता. १७व्या षटकात त्याने गिअर बदलला.. शांत असलेल्या वादळाने अचानक रुद्रावतार घेतला. त्याला रोखण्याची संधी हार्दिक व राशिदला मिळाली होती, परंतु त्यांनी ती गमावली. बटलरने ३८ चेंडूंत ३९ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पुढील १८ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. बटलर ५६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८९ धावांवर  रन आऊट झाला. राजस्थानने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला.  

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने धक्का दिला. त्याने टाकलेल्या भन्नाट चेंडूचा अंदाज घेण्यात वृद्धीमान साहा चुकला अन्  यष्टिरक्षक संजू सॅमसनने सोपा झेल टिपला. पण, त्यानंतर शुबमन गिल व मॅथ्यू वेड यांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. दोघांनीही चौफेक फटके बाजी मारली. KKRचा माजी खेळाडू असल्याने गिलला इडन गार्डनच्या खेळपट्टीचा चांगला अभ्यास होता. त्यामुळे त्याचे फटके पाहण्यासारखे होते. मात्र, ८व्या षटकात या जोडीला नजर लागली. आर अश्विनच्या गोलंदाजीवर गिलने डीप मिडविकेटच्या दिशेने फटका मारला आणि एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी पळाला. पण, वेडने त्याला माघारी जाण्यास सांगितले, तोपर्यंत गिल बराच पुढे आला होता आणि देवदत्त पडिक्कलने चेंडू हेटमायरकडे थ्रो केला होता. 

गिल २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर रन आऊट झाला. जाता जाता तो वेडला बरंच बडबडला. वेडही ( ३५)  १०व्या षटकात ओबेड मॅकॉयच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जोस बटलरने सीमारेषेवर सुरेख कॅच टिपला. 

पाहा व्हिडीओ...
 

 
 

Web Title: IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : A complete mess between Matthew Wade and Shubman Gill and Gill has to run out  for excellent 35, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.