Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थानने कमाल केली, लखनौला नमवून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली अन् इतरांची धाकधुक वाढवली

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने ( RR) रविवारी लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत मोठे फेरबदल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:31 PM2022-05-15T23:31:37+5:302022-05-15T23:32:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs RR Live Updates : Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 25 runs and moves to number 2 in the points table in IPL 2022.  | Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थानने कमाल केली, लखनौला नमवून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली अन् इतरांची धाकधुक वाढवली

Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थानने कमाल केली, लखनौला नमवून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली अन् इतरांची धाकधुक वाढवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने ( RR) रविवारी लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत मोठे फेरबदल केले. राजस्थानच्या १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने कडवी झुंज दिली होती, परंतु जोस बटलर व रियान पराग या जोडीने घेतलेली कॅच टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर लखनौचा डाव गडगडला. RRच्या यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांनी सुरेख फलंदाजी केली.  ( पाहा IPL 2022 - LSG vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड ) राजस्थानच्या खात्यात आता १६ गुण झाले आहेत आणि ते दुसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत.

१७८ धावांच्या प्रत्युत्तरात लखनौला ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात दोन धक्के दिले. क्विंटन ड कॉक ( ७) व आयुष बदोनी ( ०) सलग दोन चेंडूंवर बाद झाले. प्रसिद्ध कृष्णाने पुढील षटकात LSGचा कर्णधार लोकेश राहुलला ( १०) बाद केले. दीपक हुडा व कृणाल पांड्या यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. पण, जोस बटलरने प्रसांगवधान राखताना ही जोडी तोडली. आर अश्विनच्या गोलंदाजीवर कृणालने लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत फटका मारला. चेंडू सीमारेषेपार जातोय असे दिसताना बटलरने तो टिपला आणि तोल जाण्यापूर्वी लगेच तो रियान परागकडे फेकला. रियानने चेंडू झेलून कृणालला माघारी जाण्यास भाग पाडले. कृणाल ( २५) व दीपक यांची ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. 


दरम्यान, दीपकने आयपीएल २०२२मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी सरकला. त्यानंतर चहलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा दीपकचा प्रयत्न फसला. संजूच्या हाती चेंडू गेला आणि त्याने बेल्स उडवल्या. पण, जेव्हा बेल्स उडाल्या तेव्हा चेंडू हातात होता की नाही, हे संजूला समजले नाही आणि त्याने लगेच पुन्हा चेंडू हातात घेऊन स्टम्पच उखडून काढला.  दीपकची विकेट तपासण्यासाठी तिसऱ्या अम्पायरची मदत घ्यावी लागली. दीपक ३९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांवर माघारी परतला. ओबेड मॅकॉयने जेसन होल्डर ( १) व दुष्मंथा चमिरा( ०) यांना एकाच षटकात बाद केले. लखनौची अवस्था ७ बाद १२० झाली.  


लखनौला ६ चेंडूंत ३४ धावा करायच्या होत्या. मार्कस स्टॉयनिसने पहिला चेंडू सीमापार पाठवला, पंरतु दुसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूंत २७ धावा केल्या. लखनौला ८ बाद १५४ धावा करता आल्या आणि राजस्थानने २५ धावांनी सामना जिंकला. ट्रेंट बोल्ट ( २-२८), प्रसिद्ध ( २-३२) व मॅकॉय ( २-३५) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

जोस बटलर ( २) लगेच माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. संजूने ६ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूंत ३२ धावा केल्या. यशस्वीने २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४१ धावा केल्या. रवी बिश्नोईने १४व्या षटकात देवदत्त पडिक्कलची ( ३९ धावा, १८ चेंडू) विकेट घेतली. रियान पराग व जिमी निशॅम यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण, बिश्नोईच्या गोलंदाजीवर परागचा ( १९) अप्रतिम झेल मार्कस स्टॉयनिसने टिपला. त्याच षटकात आर अश्विन व निशॅम यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवला आणि निशॅमला ( १४) धावबाद होऊन माघारी जावे लागले. ट्रेंट बोल्ट ( १७*) व अश्विन ( १०*) यांनी राजस्थानला ६ बाद १७८ धावा उभ्या करून दिल्या.   
 

Web Title: IPL 2022 LSG vs RR Live Updates : Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 25 runs and moves to number 2 in the points table in IPL 2022. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.