Evin Lewis IPL 2022 LSG vs KKR Live Update : अविश्वसनीय; एव्हिन लुईसने टिपला अफलातून झेल अन् KKR ने गमावला हातचा सामना, Video 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : २१० धावा केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. पण, आयपीएल २०२२मधील ही सर्वात रोमहर्षक मॅच ठरली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:50 PM2022-05-18T23:50:49+5:302022-05-18T23:52:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs KKR Live Update : Unbelievable - breathtaking - That Evin Lewis mind-blowing one handed catch turned the match, Watch Video  | Evin Lewis IPL 2022 LSG vs KKR Live Update : अविश्वसनीय; एव्हिन लुईसने टिपला अफलातून झेल अन् KKR ने गमावला हातचा सामना, Video 

Evin Lewis IPL 2022 LSG vs KKR Live Update : अविश्वसनीय; एव्हिन लुईसने टिपला अफलातून झेल अन् KKR ने गमावला हातचा सामना, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : २१० धावा केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते.. त्यात मोहसिन खानने कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन्ही सलामीवीरांना ९ धावांवर माघारी पाठवले.. पण, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा निर्धार करूनच KKRचा संघ मैदानावर उतरला... श्रेयस अय्यर, नितिश राणा व स‌ॅम बिलिंग्स यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र, पुन्हा KKRची गाडी घसरली. रिंकू सिंग व सुनील नरीन यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत सामना केला... एव्हिन लुईसने तो झेल टिपला नसता तर कोलकाता प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहिले असते...

क्विंटन डी कॉक- लोकेश राहुल नाबाद २१०; आयपीएलमध्ये इतिहास घडला; ओपनर्सनी मोडले विक्रम

 

प्रथम फलंदाजी करताना राहुल व क्विंटन या जोडीने २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर,  तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात KKRची सुरुवात निराशाजनकच झाली. वेंकटेश अय्यर ( ०)  व अभिजित तोमर ( ४) यांची विकेट मोहसिन खानने घेतली. २ बाद ९ अशा अवस्थेत असणाऱ्या KKRला नितिश राणा व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सावरले. अय्यर व राणाने २७ चेंडूंत ५६ धावा चोपल्या. के गौथमने ही जोडी तोडताना नितिशला ( ४२) बाद केले. त्यांतर अय्यर व सॅम बिलिंग्स यांनी ४० चेंडूंत ६६ धावा चोपल्या.

पठ्ठ्याने २० चेंडूंत चोपल्या १०० धावा; क्विंटन डी कॉकच्या ऐतिहासिक खेळीचा हा Video पाहा! 

मार्कस स्टॉयनिसने ही जोडी तोडताना २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा करणाऱ्या अय्यरला बाद केले. त्यांना ३० चेंडूंत ७७ धावा करायच्या असताना आंद्रे रसेल ( ५)  व बिलिग्स ( ३६) माघारी परतले. मोहसिनने ४ षटकांत २० घावा देताना ३ विकेट्स घेतल्या. पण, इथे सामना संपला नव्हता. सुनील नरीन व रिंकू सिंग यांची तुफान फटकेबाजी KKR ला आशेचा किरण दाखवणारी ठरली. या दोघांनी १९ चेंडूंत ५८ धावा कुटल्या.

अखेरच्या षटकात २१ धावा असताना रिंकूने ४, ६ ,६, २ अशी सुरूवात केली. २ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिंकूने जोरदार फटका मारला आणि एव्हिन लुईसने एका हाताने तितक्याच चतुराईने तो टिपला. रिंकू १५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारासह ४० धावांवर बाद झाला. स्टॉयनिसने अखेरच्या चेंडूवर उमेश यादवची विकेट घेत लखनौला २ धावांनी सामना जिंकून दिला. कोलकाताने ८ बाद २०८ धावा केल्या. 

पाहा ती मॅच टर्निंग कॅच
 


 

Web Title: IPL 2022 LSG vs KKR Live Update : Unbelievable - breathtaking - That Evin Lewis mind-blowing one handed catch turned the match, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.