IPL 2022, CSK vs RR Live Updates : निकालाआधीच राजस्थानने पक्कं केलं PlayOffs चं स्थान, आता RCB व DC यांच्यातून ठरणार चौथा शिलेदार

IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 09:59 PM2022-05-20T21:59:25+5:302022-05-20T22:12:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 CSK vs RR Live Updates : Rajasthan Royals have sealed their place in the IPL 2022 playoffs after 1st inning against Chennai Super kings    | IPL 2022, CSK vs RR Live Updates : निकालाआधीच राजस्थानने पक्कं केलं PlayOffs चं स्थान, आता RCB व DC यांच्यातून ठरणार चौथा शिलेदार

IPL 2022, CSK vs RR Live Updates : निकालाआधीच राजस्थानने पक्कं केलं PlayOffs चं स्थान, आता RCB व DC यांच्यातून ठरणार चौथा शिलेदार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. पहिल्या ६ षटकांतक ७५ धावा देणाऱ्या RR च्या गोलंदाजांनी CSKला धक्के देताना त्यांचा धावांचा वेग संथ केला. मोईन अलीचे शतक ७ धावांनी हुकले. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना चेन्नईला कमी धावातच रोखले. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या, परंतु त्यानंतर त्यांना पुढील १४ षटकांत ५ बाद ७५ धावा करता आल्या.  गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर राजस्थानने प्ले ऑफचे तिकिट पक्के केले. 

ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले.  प्रसिद्ध कृष्णा ( १८ धावा), आर अश्विन ( १५) आणि ट्रेंट बोल्ट ( २६) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली. पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या. पण, त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. आर अश्विनने अली व कॉवने यांची ३९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. कॉनवे १६ धावांवर LBW झाला. नारायण जगदीशन ( १), अंबाती रायुडू ( ३) हे लगेच माघारी परतले. ( पाहा IPL 2022 - CSK vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

दोन जीवदान मिळालेल्या महेंद्रसिंग धोनी ( २६) व अलीने ५२ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. अली ५७ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९३ धावांवर बाद झाला. चेन्नईला ६ बाद १५० धावाच करता आल्या. चहल व मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, जोस बटलर ( २) पुन्हा अपयशी ठरला, परंतु यशस्वी जैस्वालने फटकेबाजी सुरू ठेवली आहे. राजस्थानने ४ षटकांत १ बाद ४१ धावा केल्या आहेत. 

गुजरात टायटन्स ( २०), लखनौ सुपर जायंट्स ( १८) आणि राजस्थान रॉयल्स ( १६) यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले आहे. चेन्नई सुपर किंग्सला १५० धावांवर रोखून RR ने आपल्या नेट रन रेटमध्ये प्रचंड सुधारणा केली. आता CSKला पराभूत केल्यास ते क्वालिफायर १ साठी पात्र ठरलीत आणि २४ मे रोजी कोलकाता येथे गुजरात टायटन्सविरुद्ध खेळतील. पण, पराभूत झाल्यास त्यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्केच राहिल. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शर्यत आहे. मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात दिल्लीला नमवल्यास RCBचे प्ले ऑफमधील स्थान पक्के होईल. परंतु दिल्ली जिंकल्यास RCB बाहेर जाईल. 

Web Title: IPL 2022 CSK vs RR Live Updates : Rajasthan Royals have sealed their place in the IPL 2022 playoffs after 1st inning against Chennai Super kings   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.