IPL 2021: IPL मध्ये कोरोनाचा तांडव: विराट कोहलीचा महत्वाचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह; तिसरा क्रिकेटपटू

Indian Premier League 2021 in corona Pandemic: सध्या दिल्लीची टीम मुंबईत आणि आरसीबीची टीम चेन्नईमध्ये सराव करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीची 9 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरोधात आयपीएल 2021 ची पहिली मॅच होणार आहे. यामुळे हा विराटला मोठा धक्का मानला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 01:52 PM2021-04-04T13:52:19+5:302021-04-04T13:55:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Virat Kohli's key teammate Devdutt Padikkal Corona positive; The third cricketer | IPL 2021: IPL मध्ये कोरोनाचा तांडव: विराट कोहलीचा महत्वाचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह; तिसरा क्रिकेटपटू

IPL 2021: IPL मध्ये कोरोनाचा तांडव: विराट कोहलीचा महत्वाचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह; तिसरा क्रिकेटपटू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वाढत्या कोरोना प्रकोपाने काही दिवसांत सुरु होत असलेल्या आयपीएलवर हल्ला केला आहे. एका मागोमाग एक असे क्रिकेटपट्टू आणि त्यांच्या संघ व्यवस्थापनातील कर्मचारी कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. आज तिसरा क्रिकेटपट्टू कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (Virat kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) या टीमचा आहे. (Royal Challengers Bangalore's big hitter Devdutt Padikkal Corona Positive.)

Corona Vaccination: भन्नाट आयडिया! कोरोना लसीसोबत सोन्याची नथ गिफ्ट; नागरिक मालामाल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा आघाडीचा फलंदाज देवदत्त पडीक्कलचा (Devdutt Padikkal Corona Positive) रिपोर्ट रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पडीक्कल हा तिसरा आयपीएलमधील क्रिकेटपटू आहे. यानंतर टीमने त्यांना विलगिकरणात पाठविले आहे. खेळाडू सराव करत असल्याने एकमेकांच्या संपर्कात येण्याची दाट शक्यता आहे. पडीक्कल कमीतकमी सुरवातीच्या दोन मॅच खेळणे अशक्य आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल याला देखील कोरोनाची लागण झाली होती. तर त्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणा यालाही कोरोना झाला होता. मात्र, राणा बरा झाला असून आपल्या टीमसोबत सराव करत आहे. 

Coronavirus Live updates: संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध? इकडे राज्यात, तिकडे केंद्रात तातडीच्या बैठका; निर्णयाची अपेक्षा


सध्या दिल्लीची टीम मुंबईत आणि आरसीबीची टीम चेन्नईमध्ये सराव करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीची 9 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरोधात आयपीएल 2021 ची पहिली मॅच होणार आहे. यामुळे हा विराटला मोठा धक्का मानला जात आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings)  दोन खेळाडूंसह १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर CSKची कामगिरी कशी झाली हे सर्वांना माहितच आहे.


 

आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रमुख खेळाडू नितीश राणा ( Nitish Rana) हा सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह सापडला. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर काम करणाऱ्या ८ मैदान कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यात आता दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) प्रमुख गोलंदाज अक्षर पटेल ( Axar Patel) याला कोरोना झाला आहे. 
 

Web Title: IPL 2021: Virat Kohli's key teammate Devdutt Padikkal Corona positive; The third cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.