BIG BREAKING: कोलकाताच्या संघात कोरोनाचे थैमान, खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; IPLचा आजचा सामना रद्द?

IPL 2021, RCB vs KKR: IPL 2021 Varun and Sandeep test positive for COVID 19 KKR vs RCB match is postponed: आयपीएलच्या मैदनातून मोठी घडामोड समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:26 PM2021-05-03T12:26:40+5:302021-05-03T12:28:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Varun and Sandeep test positive for COVID 19 KKR vs RCB match is postponed | BIG BREAKING: कोलकाताच्या संघात कोरोनाचे थैमान, खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; IPLचा आजचा सामना रद्द?

BIG BREAKING: कोलकाताच्या संघात कोरोनाचे थैमान, खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; IPLचा आजचा सामना रद्द?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, RCB vs KKR: आयपीएलच्या मैदनातून मोठी घडामोड समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे केकेआरचा संपूर्ण संघ विलगीकरणात गेला असून आयपीएलच्या IPL 2021 आजच्या सामन्याची वेळ बदलण्याची आल्याची माहिती समोर आली आहे. (IPL 2021 Varun and Sandeep test positive for COVID 19KKR vs RCB match is postponed)

आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार होती. कोलकोताचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ देखील आता विलगीकरणात गेला असल्यानं आजचा सामान होऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केकेआरच्या संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स  Pat Cummins देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची माहिती ऑस्ट्रेलियातील एका वृत्तसंस्थेनं दिली आहे. केकेआरच्या संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं देखील आजचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

Read in English

Web Title: IPL 2021 Varun and Sandeep test positive for COVID 19 KKR vs RCB match is postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.