IPL 2021, SRH vs PBKS Match Highlights: १२६ धावांचे लक्ष्यही सनरायझर्स हैदराबादला पेलवलं नाही, जाणून घ्या पंजाब किंग्सनं कुठे फिरवला सामना 

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Match Highlights: पंजाब किंग्सनं ( PBKS) विजयासाठी ठेवलेलं १२६ धावांचे लक्ष्यही त्यांना पेलवलं नाही आणि त्यांना पाच धावांनी हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:46 PM2021-09-25T23:46:17+5:302021-09-25T23:47:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, SRH vs PBKS Match Highlights: Punjab Kings snatches a marvelous win against SRH by 5 runs, Ravi Bishnoi the start | IPL 2021, SRH vs PBKS Match Highlights: १२६ धावांचे लक्ष्यही सनरायझर्स हैदराबादला पेलवलं नाही, जाणून घ्या पंजाब किंग्सनं कुठे फिरवला सामना 

IPL 2021, SRH vs PBKS Match Highlights: १२६ धावांचे लक्ष्यही सनरायझर्स हैदराबादला पेलवलं नाही, जाणून घ्या पंजाब किंग्सनं कुठे फिरवला सामना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Match Highlights: सनरायझर्स हैदराबाद ( SRH) आज अधिकृतपणे आयपीएल २०२१च्या प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडले. पंजाब किंग्सनं ( PBKS) विजयासाठी ठेवलेलं १२६ धावांचे लक्ष्यही त्यांना पेलवलं नाही आणि त्यांना पाच धावांनी हार मानावी लागली. ९ सामन्यांअंती त्यांना फक्त २ गुणांवरच समाधान मानावे लागले. पंजाबला मागील सामन्यात तोंडाजवळ आलेला विजयाचा घास गमवावा लागला होता, परंतु आजच्या सामन्यात त्यांनी अक्षरशः विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट नॅथन एलिस यानं अखेरच्या षटकात टिच्चून मारा करत SRHचा पराभव निश्चित केला. जाणून घेऊया सामना नेमका कुठे फिरला... 

जेसन होल्र्डरची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, पंजाब किंग्सनं शेवटच्या चेंडूवर खेचून आणला थरारक विजय

 

IPL 2021, SRH vs PBKS Match Highlights: 

  • लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, परंतु जेसन होल्डरनं एकाच षटकात या दोघांना माघारी पाठवून पंजाब किंग्सला मोठा धक्का दिला. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश ( २१) बाद झाला, तर पाचव्या चेंडूवर मयांक ( ५) माघारी परतला. ख्रिस गेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तोही राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला अन् १४ धावांवर तंबूत परतला. निकोलस पूरनचा ( ८) अपयशाचा पाढा कायम राहिला अन् अब्दुल समदनं त्याची विकेट घेतली. 
  • एडन मार्कराम ( २७) याला संदीप शर्मानं स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत माघारी पाठवून पंजाबची अवस्था ५ बाद ८८ अशी केली. १६व्या षटकात कर्णधार केन विलियम्सननं पुन्हा होल्डरला पाचारण केलं अन् त्यानं दीपक हुडाची विकेट मिळवून दिली. बदली खेळाडू जे सुचिथनं अफलातून झेल टिपला. त्यानंतर पंजाब किंग्सला डोकं वर काढणं अवघड गेलं अन् त्यांनी कशाबशा ७ बाद १२५ धावा करता आल्या. होल्डरनं १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

  • प्रत्युत्तरात हैदराबादलाही सुरुवातीला धक्के बसले. डेव्हिड वॉर्नर ( २) आणि केन विलियम्सन ( १) हे अपयशी ठरले.   मनीष पांडे ( १३) हाही माघारी परतल्यानं हैदराबादची अवस्था ३ बाद ३२ अशी झाली. वृद्धीमान सहा एका बाजूनं संयमी खेळ करत विकेट टिकवून होता, गरज होती ती त्याला दुसऱ्या बाजूनं योग्य साथ देण्याची. केदार जाधवनं मिळालेली संधी गमावली. तो १२ धावा करून माघारी परतला.
  • रवी बिश्नोईनं टाकलेल्या १३व्या षटकात सामना पलटला. त्यानं केदार जाधव व अब्दुल समदला बाद केले. हैदराबादचा निम्मा संघ ६० धावांत माघारी परतला अन् त्यांना अखेरच्या सहा षटकांत विजयासाठी ६२ धावा करायच्या होत्या. बिश्नोईनं २४ धावांत ३ विकेट्स घेऊन त्याचं महत्त्व पंजाब किंग्सच्या मॅनेजमेंटला ठणकावून सांगितले. 

  • जेसन होल्डर खिंड लढवत होता, पंरतु सहासोबत त्याचा ताळमेळ चुकला अन् हैदराबादची महत्त्वाची विकेट पडली. सहाला ( ३१) धावबाद होऊन माघारी जावं लागलं. त्यानंतर अर्षदीपनं     १७ व १९व्या षटकात अनुक्रमे ५ व ४ धावा देत प्रत्येकी १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट नॅथन एलिसनं पदार्पणाच्या सामन्यात भन्नाट २०वे षटक फेकले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सनं ६ धावांनी विजय मिळवत प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या.  
  • अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारनं पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. होल्डरनं दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. तिसरा व चौथा चेंडू निर्धाव राहिला अन् SRHला २ चेंडूं १० धावा बनवायच्या होत्या. एलिसनं अप्रतिम गोलंदाजी करताना SRH ला ४ धावा बनवू दिल्या. हैदराबादला ७ बाद १२० धावाच करता आल्या. होल्डर २९ चेंडूंत ५ चौकारांसह ४७ धावांवर नाबाद राहिला.

  • पंजाब किंग्सच्या गोलंजांनी हा विजय मिळवला. मोहम्मद शमीनं ४ षटकांत १ निर्धाव षटक फेकलं अन् १४ धावांत दोन विकेट्स घेतल्या. अर्षदीप सिंगनं २२ धावांत १, रवी बिश्नोईनं २४ धावांत ३ बळी टिपले. हरप्रीत ब्रार व नॅथन एलिस यांनी अनुक्रमे २५ व ३२ धावा दिल्या. 

Web Title: IPL 2021, SRH vs PBKS Match Highlights: Punjab Kings snatches a marvelous win against SRH by 5 runs, Ravi Bishnoi the start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.