IPL 2021: पाँटिंगने भरल्यावर 'दम', गब्बरच्या बॅटीला आलाय 'रंग'

गब्बर नावाने प्रसिध्द शिखर धवन (Shikhar Dhawan)  आयपीएलमध्ये (IPL) खऱ्या अर्थाने गब्बर ठरतोय. गेल्या तीन आयपीएलचा विचार केला तर त्यानेच सर्वाधिक धावा केल्या असून स्ट्राईक रेट व सरासरीच्या बाबतीत केवळ डीविलीयर्स हाच त्याच्या पुढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 01:37 PM2021-04-19T13:37:23+5:302021-04-19T13:39:36+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 shikhar dhawan in form after ricky ponting waring him in 2019 | IPL 2021: पाँटिंगने भरल्यावर 'दम', गब्बरच्या बॅटीला आलाय 'रंग'

IPL 2021: पाँटिंगने भरल्यावर 'दम', गब्बरच्या बॅटीला आलाय 'रंग'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गब्बर नावाने प्रसिध्द शिखर धवन (Shikhar Dhawan)  आयपीएलमध्ये (IPL) खऱ्या अर्थाने गब्बर ठरतोय. गेल्या तीन आयपीएलचा विचार केला तर त्यानेच सर्वाधिक धावा केल्या असून स्ट्राईक रेट व सरासरीच्या बाबतीत केवळ डीविलीयर्स हाच त्याच्या पुढे आहे. याच शिखर धवनची 2019 मध्ये प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं (Ricky Ponting) कानउघाडणी केली होती आणि कामगिरी दाखवली तर ठीक अन्यथा संघाबाहेर बसावे लागेल असा इशारा दिला होता. यावर आता विश्वास बसत नाही. पण पाँटिंगनं जो दम दिला त्याने चांगलेच झाले कारण त्यानंतरच्याच सामन्यात गब्बरने 63 चेंडूत 97 धावा फटकावल्या होत्या आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलेले नाही. गेल्या आयपीएलमध्ये तर त्याने लागोपाठ शतकी खेळी केल्या आणि आता यंदासुध्दा 163 च्या स्ट्राईक रेटने 186 धावा करुन तो आघाडीवर आहे. कालच पंजाबविरुध्दच्या सामन्यात त्याने 49 चेंडूत 92 धावांची खेळी केली आणि त्यामुळेच दिल्लीला 196 धावांचे लक्ष्यसुध्दा 10 चेंडू शिल्लक राखून गाठता आले. 

3 पैकी 2 सामन्यात पराभव, आता शाहरुखच्या KKRला वाचविण्यासाठी मैदानात उतरणार 'बाहुबली'

2019 च्या आधी शिखर सनरायझर्स हैदराबादकडे होता. सनरायझर्सने करारमुक्त केल्यावर तो दिल्लीच्या तंबूत आला. या टप्प्यातील धवनच्या कामगिरीतील फरक नोंद घेण्यासारखा आहे. त्याने 2019 च्या आधी आयपीएलमध्ये 120 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. हाच स्ट्राईक रेट त्याने आता 147.85 पर्यंत वाढवला आहे. याच काळात त्याने 46.95 च्या सरासरीने 1325 धावा केल्या असून ह्या धावा डीविलीयर्स, कोहली व रोहित शर्मापेक्षाही अधिक आहेत. 

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video 

आपल्या वाढत्या स्ट्राईक रेटबद्दल गब्बरने म्हटलेय की, हे मी ठरवून केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. मला स्ट्राईक रेट वाढवावा लागणार याची जाणिव होती म्हणून मी अधिक धोके पत्करायला लागलो. त्याचा मला फायदासुध्दा झाला. मी बदलांना घाबरत नाही आणि बाद होण्याचीही मला भीती वाटत नाही. 

2019 पासून आयपीएलमधील कामगिरी
फलंदाज----- धावा----- स्ट्राईक रेट--- सरासरी
शिखर -------1325 -- 147.85 ----- 46.95
डीविलीयर्स- 1021 -- 167.37 ----- 49.55
विराट ------- 1001 -- 124.58 ----- 34.63
रोहित ------- 0831 -- 128.93 ----- 29.30
 

Web Title: ipl 2021 shikhar dhawan in form after ricky ponting waring him in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.