IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ऑल राऊंडर दुबईत दाखल, पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला मुकणार

CPLची आज फायनल होणार आहे आणि त्यानंतर फॅफ, इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्राव्हो हे तीन CSKचे शिलेदार दुबईत दाखल होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:33 PM2021-09-15T12:33:23+5:302021-09-15T12:33:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Sam Curran reaches UAE for IPL 2021, but unavailable for CSK-MI fixture | IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ऑल राऊंडर दुबईत दाखल, पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला मुकणार

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ऑल राऊंडर दुबईत दाखल, पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला मुकणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 CSK vs MI : चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) ताफ्यातील इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन ( England all-rounder Sam Curran ) बुधवारी दुबईत दाखल झाला. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील यजमान संघाचा तो सदस्य होता आणि आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याच्या चार दिवस आधी तो दुबईत दाखल झाला आहे. तीन दिवसांपूर्वी मोईन अली ( Moeen ali) दुबईत दाखल झाला होता. सॅम कुरन दुबईत आला असला तरी त्याला CSK विरुद्ध मुंबई इंडियन्स या पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही. नियमानुसार त्याला ६ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघासाठी हा मोठा धक्का आहे. 

CPL 2021 : एव्हिन लुईस, ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स फायनलमध्ये 

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) आधीच दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्याही खेळण्यावर संभ्रम आहे. अशात कुरन पहिल्या सामन्याला मुकणार असल्यानं CSKसमोर संकट उभं राहिलं आहे. CPLची आज फायनल होणार आहे आणि त्यानंतर फॅफ, इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्राव्हो हे तीन CSKचे शिलेदार दुबईत दाखल होतील. CPLच्या बायो बबलमधून थेट दुबईत येणार असल्यानं या खेळाडूंना दोन दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या ट्विटनंतर कॉलीन डी ग्रँडहोमला वाहिली जातेय श्रद्धांजली, जाणून घ्या कारण 

 आयपीएल २०२१मधील CSK चे वेळापत्रक

19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
24 सप्टेंबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
30 सप्टेंबर - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
7 ऑक्टोबर - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
 
 

Web Title: IPL 2021 : Sam Curran reaches UAE for IPL 2021, but unavailable for CSK-MI fixture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.