Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडनं Spark दाखवला, Orange Cap जिंकताना मोठा पराक्रम केला

IPL 2020च्या शेवटच्या तीन सामन्यांत सलग अर्धशतकं झळकावून Spark दाखवणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं आयपीएल २०२१त लोकेश राहुल, फॅफ ड्यू प्लेसिस या तगड्या खेळाडूंना मागे टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:40 PM2021-10-16T12:40:34+5:302021-10-16T12:41:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Ruturaj Gaikwad wins IPL 2021 Orange Cap, becomes the youngest to win it | Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडनं Spark दाखवला, Orange Cap जिंकताना मोठा पराक्रम केला

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडनं Spark दाखवला, Orange Cap जिंकताना मोठा पराक्रम केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2020च्या शेवटच्या तीन सामन्यांत सलग अर्धशतकं झळकावून Spark दाखवणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad) आयपीएल २०२१त लोकेश राहुल, फॅफ ड्यू प्लेसिस या तगड्या खेळाडूंना मागे टाकले. ऋतुराजनं IPL 2021तील Orange Cap जिंकून मोठा पराक्रम केला.  ऋतुराजला अंतिम सामन्यात मोठी खेळी साकारता आी नाही. त्यानं २७ चेंडूंत १ षटकार व ३ षटकारांच्या मदतीनं ३२ धावा केल्या. या ३२ धावांच्या मदतीनं त्यानं ऑरेंज कॅप पटकावली आणि ही कॅप जिंकणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. ऋतुराजचं वय २४ वर्ष व २५७ दिवस इतकं आहे.

ऋतुराजनं आयपीएल २०२१त १६ सामन्यांत ४५.३५च्या सरासरीनं १ शतक व ४ अर्धशतकांच्या मदतीनं ६३५ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिस १६ सामन्यांत ६३३ आणि लोकेस राहुल १३  सामन्यांत ६२६ धावांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ऋतुराजनं यंदाच्या पर्वात ६४ चौकार व २३ षटकार खेचले.  

आयपीएल २०२१त सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज 

  • ऋतुराज गायकवाड - ६३५ धावा
  • फॅफ ड्यू प्लेसिस - ६३३ धावा
  • लोकेश राहुल - ६२६ धावा
  • शिखर धवन - ५८७ धावा
  • ग्लेन मॅक्सवेल - ५१३ धावा

 

आयपीएलमधील ऑरेंज कॅप विजेते खेळाडू

  • २००८ - शॉन मार्श 
  • २००९ - मॅथ्यू हेडन
  • २०१० - सचिन तेंडुलकर
  • २०११ - ख्रिस गेल
  • २०१२ - ख्रिस गेल
  • २०१३ - मायकल हसी
  • २०१४ - रॉबीन उथप्पा
  • २०१५ - डेव्हिड वॉर्नर
  • २०१६ - विराट कोहली
  • २०१७  - डेव्हिड वॉर्नर
  • २०१८ - केन विलियम्सन
  • २०१९ - डेव्हिड वॉर्नर
  • २०२० - लोकेश राहुल
  • २०२१ - ऋतुराज गायकवाड  

Web Title: IPL 2021 : Ruturaj Gaikwad wins IPL 2021 Orange Cap, becomes the youngest to win it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.