IPL 2021, RR Vs KKR T20 Live : कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची फजिती; राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मारली बाजी

IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : शुबमन गिल, इयॉन मॉर्गन यांनी राजस्थान रॉयल्सला स्वतःच्या विकेट्स गिफ्ट म्हणून दिल्या. RRच्या क्षेत्ररक्षकांनी सुरेख कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 09:21 PM2021-04-24T21:21:30+5:302021-04-24T21:22:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Chris Morris ends with 4/23, Rajasthan Royals restricted KKR for just 133 runs | IPL 2021, RR Vs KKR T20 Live : कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची फजिती; राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मारली बाजी

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची फजिती; राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मारली बाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : आज सर्व पत्ते राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) पारड्यात पडताना दिसत आहेत. नाणेफेकिचा कौल जिंकल्यानंतर संजू सॅमसननं कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. त्यांच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. राहुल त्रिपाठी व दिनेश कार्तिक यांनी छोटेखानी खेळी करून KKRची लाज राखली. RRच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली, त्यांना क्षेत्ररक्षकांचीही साजेशी साथ मिळाली. यशस्वी जैस्वालनं टिपलेला झेल, जोस बटरलरच्या डायरेक्ट हिटवर मिळालेली विकेट अन् ख्रिस मॉरिसचे धक्क्यांवर धक्के.. यामुळे RRनं वर्चस्व गाजवलं...IPL 2021 : RR Vs KKR T20 Live Score Update वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video

सुभमन गिल ७ धावांवर जीवदान मिळूनही आज करिष्मा दाखवता आला नाही. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जोस बटलरच्या डायरेक्ट हिटवर गिलला ( ११) धावबाद होऊन तंबूत जावं लागलं. नितीश राणा व राहुल त्रिपाठी या जोडीनं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पंरतु चेतन सकारियानं स्लोव्हर चेंडूवर राणा ( २२) यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. KKRचा मंदावलेली धावांच गती वाढवण्यासाठी सुनील नरीनला प्रमोशन दिलं, परंतु जयदेव उनाडकटच्या स्लोव्हर बाऊन्सरवर पुल मारण्याचा प्रयत्न फसला. यावेळी यशस्वी जैस्वालनं चूक न करता अफलातून झेल टिपला. RR Vs KKR, RR Vs KKR live score


कर्णधार इयॉन मॉर्गनला डायमंड डकवर बाद होऊन माघारी परतावे लागले. राहुल त्रिपाठीनं मारलेला सरळ फटका नॉन स्ट्रायकर मॉर्गनच्या बॅटला लागून अडला अन् हो-नाही- हो-नाही करता करता ख्रिस मॉरिसनं त्याला धावबाद केले. त्रिपाठी फटकेबाजी करून KKRला समाधानकारक पल्ला गाठून देईल असे आशादाई चित्र दिसत असताना मुश्ताफिजूर रहमाननं त्याला बाद केलं. त्रिपाठी २६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३६ धावांवर बाद झाला. १६व्या षटकात KKRच्या ५ बाद ९८ धावा झाल्या होत्या. IPL 2021, IPL 2021 latest news, RR Vs KKR IPL Matches

आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीची सर्वांना प्रतीक्षा होती, परंतु ख्रिस मॉरिसनं त्याला ( ९) धावांवर माघारी पाठवले. मॉरिसनं त्याच षटकात दिनेश कार्तिकलाही ( २५) माघारी पाठवले. चेतन सकारियानं हवेत झेपावत अफलातून झेल घेतला. मुश्ताफिजूर ( १-२२), जयदेव उनाडकट ( १-२५) आणि चेतन सकारिया ( १-३१) यांनी सुरेख स्पेल टाकला. ख्रिस मॉरिसनं २३ धावांत चार विकेट्स घेत KKRला २० षटकांत ९ बाद १३३ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. IPL 2021 RR Vs KKR, RR Vs KKR Live Match
 

Web Title: IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Chris Morris ends with 4/23, Rajasthan Royals restricted KKR for just 133 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.