IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:38 PM2021-04-27T21:38:38+5:302021-04-27T21:39:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : sandstorm at the ground right now, We're likely to have a slight delay  | IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांसमोर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे फलंदाज माघारी परतले असताना एबीनं रजत पाटीदार सह संघाचा बेस पक्का केला. त्यान आजच्या सामन्यात ४०वे आयपीएल अर्धशतक पूर्ण करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं मोठी धावसंख्या उभी केली. पहिला डाव संपल्यानंतर स्टेडियमवर चक्रीवादळ आलं आणि त्यामुळे दुसरा डाव सुरू होण्यासाठी बराच वेळ विलंब होत आहे. IPL 2021 : RCB Vs DC T20 Live Score Update


विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांचे संघ आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडत आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं  ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ( Royal Challengers Banglore) साजेशी सुरुवात करता आली नाही. आवेश खाननं चौथ्या षटकात विराट कोहलीला ( १२) आणि इशांत शर्मानं पाचव्या षटकात देवदत्त पडीक्कलला ( १७) माघारी पाठवले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५)  माघारी जाण्यास भाग पाडले. RCBनं १० षटकांत ३ बाद ६८ धावा केल्या होत्या. RCB Vs DC, RCB Vs DC live score,

एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदारला आज संधी मिळाली आणि त्यानं चांगला खेळ करून कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पण, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् तो २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या.  IPL 2021, IPL 2021 latest news, RCB Vs DC IPL Matches

Web Title: IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : sandstorm at the ground right now, We're likely to have a slight delay 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.