IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांचे संघ आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 07:04 PM2021-04-27T19:04:30+5:302021-04-27T19:13:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Daniel Sams making debut for RCB, DC have won the toss, know Playing XI  | IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांचे संघ आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. मागच्या सामन्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघाची चार सामन्यांतील विजयाची मालिका CSKनं खंडित केली होती, तर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) सुपर ओव्हरमध्ये SRHला नमवले आहे. त्यामुळे आज कोणाचं पारडं जड ठरतं याची सर्वांना उत्सुकता आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. IPL 2021 : RCB Vs DC T20 Live Score Update

आरसीबीला फॉर्मात असलेला सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल (१७१ धावा) आणि कोहली (१५१ धावा) यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे.  मधल्या फळीकडून मात्र या दोघांना सहकार्य लाभले नाही. आरसीबी डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदला संधी देऊ शकते. दिल्ली संघाला सलामीवीर फलंदाज व स्पर्धेत सर्वाधिक धावा फटाकाविण्यात अव्वल स्थानी असलेल्या शिखर धवनकडून (२५९) फॉर्म कायम राखण्याची आशा असेल. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉसुद्धा (१६६) मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. RCB Vs DC, RCB Vs DC live score

  • आर अश्विनच्या जागी दिल्लीच्या संघात इशांत शर्मा
  • RCBच्या ताफ्यात डॅनिएल सॅम्स व रजत पाटिदार यांची एन्ट्री, डॅन ख्रिस्टियन व नवदीप सैनी यांना विश्रांती
  • आयपीएल २०२१च्या सुरुवातीला RCB नं डॅनिएल सॅम्सला DCकडून ट्रेड केले होते. 

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, स्टीव्ह स्मिथ, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कागिसो रबाडा, इशात शर्मा, आवेश खान ( Delhi Capitals -  Prithvi Shaw, Shikhar Dhawan, Rishabh Pant(w/c), Steven Smith, Shimron Hetmyer, Marcus Stoinis, Axar Patel, Amit Mishra, Kagiso Rabada, Ishant Sharma, Avesh Khan) 

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर - विराट कोहली. देवदत्त पडीक्कल, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, डॅनिएल सॅम्स, कायले जेमिन्सन, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज ( Royal Challengers Bangalore - Virat Kohli(c), Devdutt Padikkal, Rajat Patidar, Glenn Maxwell, AB de Villiers(w), Washington Sundar, Daniel Sams, Kyle Jamieson, Harshal Patel, Yuzvendra Chahal, Mohammed Siraj) 

Web Title: IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Daniel Sams making debut for RCB, DC have won the toss, know Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.