IPL 2021, RCB vs CSK, Live: धोनीनं नाणेफेक जिंकली, CSK नं आणलं इमरान ताहीरला, तर RCB च्या ताफ्यात नवदीप सैनी!

IPL 2021, RCB vs CSK, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईतील वानखेडे मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात सामना होतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 02:40 PM2021-04-25T14:40:07+5:302021-04-25T15:10:31+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 rcb vs csk royal challengers bangalore vs chennai super kings live score updates | IPL 2021, RCB vs CSK, Live: धोनीनं नाणेफेक जिंकली, CSK नं आणलं इमरान ताहीरला, तर RCB च्या ताफ्यात नवदीप सैनी!

IPL 2021, RCB vs CSK, Live: धोनीनं नाणेफेक जिंकली, CSK नं आणलं इमरान ताहीरला, तर RCB च्या ताफ्यात नवदीप सैनी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, RCB vs CSK, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईतील वानखेडे मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात सामना होतोय. सामन्याची नाणेफेक चेन्नई सुपरकिंग्जनं जिंकली असून धोनीनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी

चेन्नईच्या संघात एक बदल करण्यात आला असून मोईन अली अनफिट असल्यानं त्याच्या जागी ड्वेन ब्राव्होला संधी देण्यात आली आहे. तर आरसीबीच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. आरसीबीनं आपल्या ताफ्यात आणखी एका वेगवान गोलंदाजाला दाखल केलंय. आरसीबीनं आज नवदीप सैनीला संधी दिली आहे. तर केन रिचर्डसनच्या जागी डॅनिअल ख्रिश्चनला पुन्हा एकदा संघात दाखल केलं आहे.

IPL 2021: ख्रिस गेल झालाय 'मिस्टर इंडिया'मधील अमरिश पुरींचा फॅन, पाहा खास Video

आरसीबीची यंदाच्या सीझनची सुरुवात दणक्यात झाली असून सुरुवातीचे चारही सामने कोहली ब्रिगेडनं जिंकले आहेत. तर चेन्नई सुपरकिंग्जनं सुरुवातीचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना गमावल्यानंतर पुढचे तिनही सामने जिंकले आहेत. त्यामुळे विजयी रथ कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. 

संघ (Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings)

रॉयल चॅलेंजर्स बंगोलर (Royal Challengers Bangalore)
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स, कायले जेमिन्सन, वॉशिंग्टन सुंदर, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी

चेन्नई सुपरकिंग्ज (Channai Super Kings)
ऋतूराज गायकवाड, फॅफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, सॅम कुरन, शार्दुल ठाकूर, इमरान ताहीर, दिपक चाहर 
 

Web Title: ipl 2021 rcb vs csk royal challengers bangalore vs chennai super kings live score updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.