IPL 2021, RCB vs CSK, Live : रवींद्र जडेजाचा RCBवर एकहाती विजय; CSKचा एकच वाघ विराट कोहलीवर पडला भारी

ipl 2021  t20 CSK Vs RCB live match score updates Mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) असा सामना नव्हे तर रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) Vs Royal Challengers असा सामना रंगला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 07:17 PM2021-04-25T19:17:03+5:302021-04-25T19:17:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB vs CSK, Live: Ravindra Jadeja winning the battle against RCB, CSK won by 69 runs | IPL 2021, RCB vs CSK, Live : रवींद्र जडेजाचा RCBवर एकहाती विजय; CSKचा एकच वाघ विराट कोहलीवर पडला भारी

IPL 2021, RCB vs CSK, Live : रवींद्र जडेजाचा RCBवर एकहाती विजय; CSKचा एकच वाघ विराट कोहलीवर पडला भारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 CSK Vs RCB live match score updates Mumbai : २८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट... आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) असा सामना नव्हे तर रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) Vs Royal Challengers असा सामना रंगला. महेंद्रसिंग धोनीनं प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्मय जडेजानं २०व्या षटकात ३६ धावा चोपून सार्थ ठरवला, त्यानंतर गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात जडेजानं एकहाती RCBला नाचवलं. इम्रान ताहीरनंही त्याची निवड योग्य ठरवताना दोन विकेट्स घेतल्या. विराट कोहलीच्या RCBवर एकटा रवींद्र जडेजा भारी पडला. विराट कोहलीच्या संघाची अपराजित मालिका आज खंडीत झाली. IPL 2021 : CSK Vs RCB T20 Live Score Update

फॉर्मात परतलेल्या ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ( ३३) माघारी परतला.   रैनानं १८ चेंडूत २४ धावा केल्या. तर अंबाती रायुडूनं ७ चेंडूत १४ धावांचं योगदान दिलं. सामन्यात हर्षल पटेल यानं तीन विकेट्स जरी घेतल्या, परंतु जडेजानं त्याच्या मेहनतीवर पाणी फिरवले.  फॅफनं ४१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५० धावा केल्या. CSK Vs RCB, CSK Vs RCB live score


जडेजानं पहिल्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेनं षटकार खेचला. त्यानंतर यॉर्कर चेंडूवर पुन्हा त्याच दिशेनं षटकार खेचला. हर्षलनं तिसरा चेंडू फुलटॉस फेकला आणि जडेजानं त्यालाही सीमापार टोलवले. पंचांनी तो नो बॉल दिला अन् फ्री हिटवरही जडेजान डीप मिडविकेटवर षटकार खेचला. त्यानंतर पुढील तीन चेंडूंवर २, ६ व ४ अशा धावा आल्या. जडेजानं या षटकांत ३६ धावा चोपल्या, तर एक नो बॉलमुळे आयपीएलमधील हे सर्वात महागडे ( ३७ धावा) षटक ठरले. जडेजानं २८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६२ धावा चोपल्या. CSKनं ४ बाद १९१ धावा केल्या. IPL 2021 latest news, CSK Vs RCB IPL Matches


प्रत्युत्तरात विराट कोहली व देवदत्त पडीक्कल यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी ३ षटकांत ४४ धावा चोपल्या. सॅम कुरननं RCBला मोठा धक्का देताना कर्णधार विराट कोहलीला ( ८) माघारी पाठवले. त्यानंतर शार्दूल ठाकूरनं RCBचा फॉर्मात असलेला सलामीवीर देवदत्त पडीक्कल ( ३४) याला बाद केलं. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या रवींद्र जडेजानं गोलंदाजीतही RCBवर वर्चस्व गाजवले. पहिल्याच षटकात त्यानं वॉशिंग्टन सुंदर ( ७) याची विकेट घेतली आणि त्यानंतर पुढील षटकार ग्लेन मॅक्सवेलचा ( २२) त्रिफळा उडवला. CSK Vs RCB IPL Matches, CSK Vs RCB IPL match 2021


जडेजान फलंदाजी व गोलंदाजीतच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही योगदान दिलं. त्यानं डॅनिएल ख्रिस्टीनला डायरेक्ट हिटवर धावबाद केलं.  एबी डिव्हिलियर्स ही RCBची अखेरची आशाही जडेजानं ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मावळून टाकली. जडेजानं त्याचा त्रिफळा उडवला. ६ बाद ८३ धावांमुळे ११ व्या षटकातच RCBचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. जडेजानं ४ षटकांत एक निर्धाव षटकासह १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इम्रान ताहीरनं १६ धावांत २ विकेट्स घेतल्या. RCBला ९ बाद १२२ धावा करता आल्या अन् CSKनं ६९ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.  CSK Vs RCB Live Score, IPL 2021 CSK Vs RCB, CSK Vs RCB Live Match

Web Title: IPL 2021, RCB vs CSK, Live: Ravindra Jadeja winning the battle against RCB, CSK won by 69 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.