IPL 2021: दीपक हूडा तुफान खेळला; तेंडुलकरचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

IPL 2021: सचिन तेंडुलकरचा विक्रम दीपक हुडानं मोडीत काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 03:26 PM2021-04-13T15:26:39+5:302021-04-13T15:32:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 punjab kings Deepak Hooda hits 20 ball half century breaks sachin tendulkars record | IPL 2021: दीपक हूडा तुफान खेळला; तेंडुलकरचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

IPL 2021: दीपक हूडा तुफान खेळला; तेंडुलकरचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात धावांचा धबधबा कोसळला. फलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा अखेरच्या चेंडूवर पराभव करत विजयी सलामी दिली. कर्णधार लोकेश राहुल आणि दीपक हूडा यांचे तडाखेबंद अर्धशतक पंजाबच्या विजयात मोलाचे ठरले. या सामन्यात अनेक विक्रमही रचले. यामध्ये भाव खाल्ला तो दीपक हूडाने. त्याने थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचीच कामगिरी मागत टाकून सर्वांचे लक्ष वेधले.

मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO

राहुलने आक्रमक खेळी करताना ९१ धावांचा तडाखा दिला. आयपीएलमधील हे त्याचे २२ वे अर्धशतक ठरले. सर्वाधिक अर्धशतक झळकावणाºयांमध्ये तो आता १२व्या स्थानी आला असून यामध्ये त्याने शेन वॉटसनला मागे टाकले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू असलेल्या वॉटसनने गेल्याच वर्षी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. वॉटसनने १४५ सामन्यांतून २१ अर्धशतक झळकावले, तर राहुलने ८२ सामन्यांतच २२ अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला.

दिल्ली कॅपिटल्समध्ये राडा; दोन प्रमुख फलंदाजांमध्ये जुंपली कुस्ती, पाहा...

दुसरीकडे, दीपकने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना राजस्थानच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्यांमध्ये तो संयुक्तपणे सातव्या स्थानी असून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या अनकॅप्ड भारतीयांमध्ये तो दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय दीपने दिग्गज सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला. सचिनचा विक्रम मोडताना दीपकने वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनीची बरोबरीही साधली. सेहवागने २०१२ मध्ये राजस्थानविरुद्ध २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. धोनीने २०१२ साली मुंबईविरुद्ध २० चेंडूंत अर्धशतकी तडाखा दिलेला. त्याचप्रमाणे, सचिनने २०१० साली दिल्लीविरुद्ध खेळताना २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते.

याशिवाय दीपकने कृणाल पांड्याचाही विक्रम मोडला. कृणालने २०१६ साली दिल्लीविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तर २०१५ मध्ये दीपकने दिल्लीविरुद्धच २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते, यानिमित्ताने दीपकने स्वत:चाच एक विक्रमही मोडला.  

 

Web Title: IPL 2021 punjab kings Deepak Hooda hits 20 ball half century breaks sachin tendulkars record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.