IPL 2021 : 'रिलीज' केलं म्हणून पार्थिव पटेलनं आभार मानत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केलं ट्रोल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनपूर्वी ( IPL 2021 Mini Auction) संघातील १० खेळाडूंना रिलीज केलं, तर १२ खेळाडूंना कायम राखले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 21, 2021 02:24 PM2021-01-21T14:24:02+5:302021-01-21T14:24:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Parthiv Patel thanks Royal Challengers Bangalore for trolling 'Release' | IPL 2021 : 'रिलीज' केलं म्हणून पार्थिव पटेलनं आभार मानत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केलं ट्रोल

IPL 2021 : 'रिलीज' केलं म्हणून पार्थिव पटेलनं आभार मानत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केलं ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनपूर्वी ( IPL 2021 Mini Auction) संघातील १० खेळाडूंना रिलीज केलं, तर १२ खेळाडूंना कायम राखले. यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCBनं समाधानकारक कामगिरी केली होती. त्यामुळे संघ व्यवस्थापनानं त्यांच्या बऱ्याच खेळाडूंना कायम राखले. पण, त्यांनी रिलीज केलेल्या १० खेळाडूंमध्ये पार्थिव पटेलचं ( Parthiv Patel) नाव असल्यानं जरा आर्शर्याचा धक्का बसला. माजी उप कर्णधार पटेलनं मात्र RCBचे आभार मानून संघाला ट्रोल केलं. 

२०१८मध्ये RCBनं पटेलला पुन्हा करारबद्ध केले आणि २०१९च्या आयपीएलमध्ये नियमित सदस्य होता. आयपीएल २०२०त एबी डिव्हिलियर्सकडे यष्टिरक्षक-फलंदाजाची जबाबदारी देण्यात आली. पटेलनं सलामीवीराचे स्थान गमावले आणि RCBनं देवदत्त पडीक्कलला संधी दिली. यूएईत पडीक्कलन धावांचा पाऊस पाडला. आयपीएलचे १३ वे पर्व संपल्यानंतर महिन्याभरात पटेलनं व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे तो साहजिकच आयपीएल २०२१मधून बाहेरच पडला होता.  

तरीही फ्रँचायझीनं रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव नमूद केलं. पटेलनं मग ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. त्यानं ट्विट केलं की,''निवृत्तीनंतर संघानं रिलीज केलं, हे मी माझे भाग्य समजतो. RCB धन्यवाद...'' 


२०१४च्या आयपीएलमध्येही पटेल हा RCBचा सदस्य होता. आता तो मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काऊट टीमचा सदस्य आहे.   

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर - रिलीज खेळाडू : मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच,ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना, उमेश यादव

रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे; 

३५.९० कोटी शिल्लक- यातून त्यांना ९ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंना ताफ्यात घ्यायचे आहे.

डॅनिएल सॅम्स व हर्षल पटेल यांना दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेड केले

Web Title: IPL 2021: Parthiv Patel thanks Royal Challengers Bangalore for trolling 'Release'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.