IPL 2021 : निकोलस पूरन पगारातील रक्कम करणार भारताच्या कोरोना लढ्यात दान; पंजाब किंग्सचाही मदतीसाठी पुढाकार 

वेस्ट इंडिज व पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यानं भारताच्या कोरोना लढ्यात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:10 PM2021-04-30T16:10:03+5:302021-04-30T16:12:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Nicholas Pooran to donate portion of IPL salary, PBKS to help provide oxygen concentrators for India's fight against Covid-19 | IPL 2021 : निकोलस पूरन पगारातील रक्कम करणार भारताच्या कोरोना लढ्यात दान; पंजाब किंग्सचाही मदतीसाठी पुढाकार 

IPL 2021 : निकोलस पूरन पगारातील रक्कम करणार भारताच्या कोरोना लढ्यात दान; पंजाब किंग्सचाही मदतीसाठी पुढाकार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेस्ट इंडिज व पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यानं भारताच्या कोरोना लढ्यात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारी ३ लाख ८६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थाही कोलमडत चालली आहे. अशात समाजातील दिग्गज मंडळी पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आली आहेत. निकोलस पूरननं त्याच्या आयपीएल पगारातील काही रक्कम कोरोना लढ्यासाठी भारताला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय पंजाब किंग्सही ( Punjab Kings) ऑक्सिजन सिलेंडरसाठी निधी गोळा करत आहे. कोलकाता नाईट रायडर्समुळे आयपीएल कंटाळवाणा वाटतोय, फास्ट फॉरवर्डनेच त्यांचे सामने पाहणार - वीरेंद्र सेहवाग 

ऑस्ट्रलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स यानं PM Care Fund मध्ये ऑक्सिजन खरेदीसाठी ५० हजार डॉलर म्हणजे जवळपास ३७ लाख रुपये दान केले. माजी गोलंदाज ब्रेट ली यानंही ४३ लाख दान केले. राजस्थान रॉयल्सनं त्यांच्या खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि मालक यांच्याकडून निधी गोळा करून ७.५ कोटींची मदत जाहीर केली. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानंही १ कोटी दान केले. सहा चेंडूंत सहा चौकार; KKRचा गोलंदाज शिवम मावी यानं पडकली पृथ्वी शॉची मान, Video Viral

२०१९च्या लिलावात पंजाब किंग्सनं ४.२ कोटींत पूरनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.  त्यानं २७ सामन्यांत ५४९ धावा केल्या आहेत.  निकोलस पूरननं ट्विट केलं की,''अनेक देश कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत, परंतु भारतातील परिस्थिती ही भयाण झाली आहे. भारताच्या या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे आणि जनजागृती करण्यासोबतच आर्थिक मदतीचा खारीचा वाटा उचलत आहे. #PrayForIndia".


पंजाब किंग्सनंही ऑक्सिजन सिलेंडर खरेदीसाठी निधी जमा करण्याचं आवाहन केलं आहे.  

Web Title: IPL 2021 : Nicholas Pooran to donate portion of IPL salary, PBKS to help provide oxygen concentrators for India's fight against Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.