Video : "एक नारळ दिलाय..."! आगरी गाण्यावर रोहित, जसप्रीत, सूर्यकुमार अन् पांड्या बंधूंचा भन्नाट डान्स

Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ ( Mumbai Indians) यंदा जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI चा संघ कसून सरावालाही लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 05:32 PM2021-04-06T17:32:16+5:302021-04-06T17:33:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Mumbai Indians player dance step on Agari song, Video goes Viral | Video : "एक नारळ दिलाय..."! आगरी गाण्यावर रोहित, जसप्रीत, सूर्यकुमार अन् पांड्या बंधूंचा भन्नाट डान्स

Video : "एक नारळ दिलाय..."! आगरी गाण्यावर रोहित, जसप्रीत, सूर्यकुमार अन् पांड्या बंधूंचा भन्नाट डान्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ ( Mumbai Indians) यंदा जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI चा संघ कसून सरावालाही लागला आहे. त्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील सर्वच खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि कृणाल पांड्या यांनी इंग्लंडविरुद्धचा मालिकेत पदार्पण करताना दमदार कामगिरी केली आहे. क्विंटन डी कॉकही पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करून मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. ९ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाशी होणार आहे. पण, तत्पूर्वी खेळाडूंनी फोटोशूट करून घेतलं आणि त्यावेळी ते आगरी गाण्यावर नाचताना दिसले.  IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या संघात कोरोना व्हायरसचा शिरकाव, प्रमुख सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सलग तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावण्याची संधी
Indian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आतापर्यंत एकाही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही. MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) पाच जेतेपद पटकावली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा, तर कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा ही कामगिरी केली आहे. IPL 2021 : क्रिकेटपटू झाला नसता तर सीरियात ISISचा अतिरेकी झाला असता, CSKच्या खेळाडूबाबत तस्लीमा नसरीनचं वादग्रस्त विधान 

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians full squad ) - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर. IPL 2021साठी पाच खेळाडूंनी दाखवला पाकिस्तानला 'ठेंगा'; मालिका मध्येच सोडून भारतात दाखल!

भन्नाट डान्स
प्रसिद्ध आगरी गाणं ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ यावर रोहित, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार व हार्दिक-कृणाल पांड्या बंधू थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा  तुफान व्हायरल झाला आहे. 

Web Title: IPL 2021 : Mumbai Indians player dance step on Agari song, Video goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.