IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं!

IPL 2021, MI vs RR, Live Update Score: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:49 PM2021-04-29T16:49:54+5:302021-04-29T17:20:23+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 mi vs rr live score updates rajasthan royals set 172 runs target in front of mumbai indians | IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं!

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs RR, Live: आयपीएलमध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघानं मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी सलामीसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. जोस बटलरनं ३२ चेंडूत ४१ धावांची तर यशस्वी जयस्वालनं २० चेंडूत ३२ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून राहुल चहर आणि बुमराह वगळता इतर कोणताही गोलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. जयंत यादव याच्या तीन षटकांत राजस्थानच्या फलंदाजांनी ३३ धावा कुटल्या. तर आज संघात संधी देण्यात आलेल्या नेथन कुल्टर नाइल यालाही राजस्थानच्या फलंदाजांनी धुतलं. कुल्टर नाइलनं सामन्यात चार षटकं केली आणि एकही विकेट न घेता ३५ धावा दिल्या. 

IPL 2021 : ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर!

राजस्थानची सुरुवात दमदार झाली असतानाच मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरनं मोठं यश मिळवून दिलं. चहरनं बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनाही बाद केलं. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी संघाच्या धावसंख्येला आकार देत मैदानात जम बसवला. सुरुवात दमदार झालेली असतानाही अखेरच्या षटकांमध्ये राजस्थानच्या धावसंख्येला लगाम घालण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आल्याचं पाहायला मिळालं. सामन्याच्या १८ व्या षटकात ट्रेंट बोल्टनं सॅमसनला क्लीन बोल्ड केलं. सॅमसन २७ चेंडूत ४२ धावा करुन माघारी परतला. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहनं केवळ एक विकेट घेतली असली तरी त्याच्या चार षटकांमध्ये केवळ १५ धावा आल्या. बुमराहने शिवम दुबेला ३५ धावांवर बाद केलं. 

 

Web Title: ipl 2021 mi vs rr live score updates rajasthan royals set 172 runs target in front of mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.