IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : एकाच सामन्यात सर्व योग जुळून आले; गोलंदाजांची कमाल, हार्दिकचा फॉर्म अन् संपवला पराभवाचा काळ

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Match Highlights : मुंबई इंडियन्स कधी मुसंडी मारेल याचा नेम नाही. दुसऱ्या टप्प्यात सलग तीन पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं गणित बिघडलं होतं. पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:43 PM2021-09-28T23:43:16+5:302021-09-28T23:43:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : Kieron Pollard, Hardik Pandya and Saurabh Tiwary star as MI end 3-match losing streak | IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : एकाच सामन्यात सर्व योग जुळून आले; गोलंदाजांची कमाल, हार्दिकचा फॉर्म अन् संपवला पराभवाचा काळ

IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : एकाच सामन्यात सर्व योग जुळून आले; गोलंदाजांची कमाल, हार्दिकचा फॉर्म अन् संपवला पराभवाचा काळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Match Highlights : मुंबई इंडियन्स कधी मुसंडी मारेल याचा नेम नाही. दुसऱ्या टप्प्यात सलग तीन पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं गणित बिघडलं होतं. पण, आजच्या सामन्यात सर्व योग जुळून आले. गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. इशान किशनच्या जागी संधी मिळालेल्या सौरभ तिवारीनं दमदार बॅटिंग केली अन् त्यानंतर हार्दिक पांड्याची फटकेबाजी लाजवाब होती. आता हाच फॉर्म कायम राखल्यास मुंबई इंडियन्सला रोखणं अवघड आहे. 

IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : 

  • मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच टिच्चून मारा करताना पंजाब किंग्सवरील दडपण वाढवले. मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत मनदीप  सिंग व लोकेश राहुल यांनी डावाची सुरुवात केली, परंतु दोघांनाही बॅट व बॉल याच्यातील संपर्क जुळवता येत नव्हता. कृणाल पांड्यानं मनदीपला बाद करून पहिला धक्का दिला. 
  • याच कृणाल पांड्यानं दाखवलेल्या खिलाडूवृत्तीनं लोकेश राहुलला जीवदान दिलं. गेलनं मारलेला फटका नॉन स्ट्रायकर लोकेशच्या हातावर आदळून कृणालकडे गेला अन् त्यानं बेल्स उडवत अपील केले. पण, तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागण्यापूर्वी त्यानं ते मागेही घेतलं. 

  • किरॉन पोलार्डनं एकच षटक फेकलं, पण त्यात त्यानं गेल व लोकेशला बाद करून पंजाबला मोठे धक्के दिले. एडन मार्कराम व दीपक हुडा यांनी अर्धशतकी भागीदारी करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, मुंबईच्या गोलंदाजांनी आज अफलातून गोलंदाजी केली व पंजाबला १३५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.
  • प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचीही सुरुवात काही खास झाली नाही. पंजाब किंग्सचा मागील सामन्यातील स्टार गोलंदाज रवी बिश्नोई यानं आजही कमाल केली. त्यानं पहिल्याच षटकात रोहित शर्मा ( ८) व सूर्यकुमार यादव ( ०) यांची विकेट घेतली. पुन्हा एकदा सूर्यकुमार अपयशी ठरल्यानं मुंबईची डोकेदुखी वाढत चालली आहे.

  • सौरभ तिवारी एकटा खिंड लढवत होता, परंतु त्याला रोखण्यासाठी पंजाबनं सर्व प्रयत्न केले. त्यानं ३७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलवले आहे.
  • हार्दिक पांड्याचं परतलेला फॉर्म हा आजच्या सामन्याती मुंबईसाठीचा मोठा प्लस पॉईंट ठरला. त्यानं ३० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांनी नाबाद ४० धावा केल्या. पोलार्ड ७ चेंडूंत १५ धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासारखी कामगिरी पंजाबच्या गोलंदाजांना करता आली नाही. 

Web Title: IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : Kieron Pollard, Hardik Pandya and Saurabh Tiwary star as MI end 3-match losing streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.